शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापौर व उपमहापौर निवडणूक बुधवारी, महाविकास आघाडीत चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 21:28 IST

भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी शिवसेना व काँग्रेसचे मिळून ४ नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. शिवसेनेने देखील मोर्चेबांधणी चालवली आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक होत आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी शिवसेना व काँग्रेसचे मिळून ४ नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. शिवसेनेने देखील मोर्चेबांधणी चालवली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी शहरात तळ ठोकला असून, एकूणच चुरस व तणाव पाहता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपाकडून ज्योत्स्ना हसनाळे तर शिवसेनेकडून अनंत शिर्के यांच्यात लढत होणार आहे. उपमहापौरपदासाठी भाजपाकडून हसमुख गेहलोत व मदन सिंह या दोघांनी अर्ज भरल्याने एकास माघार घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून मर्लिन डिसा उपमहापौरपदाच्या उमेदवार आहेत. भाजपाकडे ६१, शिवसेनेकडे २२ व काँग्रेस आघाडीकडे १२ नगरसेवक आहेत. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी भाजपाच्या गळास सेनेच्या दोन व काँग्रेसचे दोन असे महाविकास आघाडीचे चार नगरसेवक लागले असल्याची चर्चा आहे.शिवसेनेने काँग्रेस सोबत मिळून महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर व उपमहापौर बनवण्याचा चंग बांधला असला तरी त्यांना त्यांचेच नगरसेवक सांभाळता आलेले नाहीत. सेनेच्या नगरसेवकांना लोणावळा येथे ठेवले होते. तर भाजपामध्ये देखील नाराजी व बंडाळीची धास्ती असल्याने नगरसेवकांना आधी गोवा मग सी एन रॉक येथे ठेवण्यात आले. त्यांचा संपर्क कोणाशी होऊ नये म्हणून मोबाईल देखील काढले आहेत. नगरसेवकांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक उमेदवारांचा पत्ता कापला गेला असतानच भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी मेहतां विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकारायांना तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. मेहतांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याची कुणकुण आधीच लागल्याने मेहतांनी सोमवारी सायंकाळीच भाजपा व राजकारण सोडत असल्याचे जाहिर केले होते. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली असुन मेहतांचे समर्थक व भाजपा नगरसेवक काय भुमिका घेतात हे देखील स्पष्ट होईल. एकुणच या निवडणुकी तील चुरस व तणाव पाहता पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.