शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

TMC: महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित; सत्ताधाऱ्यांच्या हालचालींना वेग, 'या' नावांची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:12 IST

TMC Mayor: ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी युतीत महापौरपदावर कोणाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः शिंदे सेनेतील काही नावं आता पुढे आली आहेत. तर भाजपने केलेल्या दाव्यांतर त्यांना संधी मिळाल्यास त्यांच्याकडील दोन नावे पुढे आली आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली होती. १३१ जागांसाठी झालेल्या या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) साठी ३५ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता महापौर पदही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हे स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिका निवडणूक शिंदे सेना आणि भाजप यांनी युतीत लढवली होती. निवडणुकीत शिंदे सेनेने ७५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौर पद त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या ९ जागांपैकी ७ जागा शिंदे सेनेकडून तर २ जागा भाजपकडून लढवण्यात आल्या होत्या.

शिंदे सेनेकडील संभाव्य चेहरे

शिंदे सेनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील सात नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये प्रभाग ३ (अ) महिला – पद्मा भगत, प्रभाग ६ (अ) महिला – वनिता घोगरे, प्रभाग ७ (अ) महिला – विमल भोईर, प्रभाग ९ (अ) – गणेश कांबळे, प्रभाग १६ (अ) – डॉ. दर्शना जानकर, प्रभाग २४ (अ) महिला – आरती गायकवाड आणि प्रभाग २८ (अ) – दीपक जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे या सातपैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याशिवाय कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडून आलेल्या शर्मिला पिंपोळकर यांचेही नाव चर्चेत असल्याची माहिती असून, राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्यास त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपला संधी मिळाल्यास हे चेहरे पुढे

युतीचा धर्म लक्षात घेता भाजपने महापौर पदावर दावा केला असून शिंदे सेनेसमोर तशी भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे. जर भाजपच्या वाट्याला महापौर पद गेले, तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे दोन नगरसेवक चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक १५ (अ) मधून सुरेश कांबळे तर प्रभाग २२ (अ) महिला मधून उषा वाघ यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपकडून यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Mayor Post Reserved for SC; Political Activity Intensifies

Web Summary : Thane's mayor post is now reserved for Scheduled Caste. Shiv Sena Eknath Shinde faction leads with seven potential candidates. BJP also eyes the position with two possible names, pending alliance decisions. Discussions intensify within political circles.
टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण