शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडत तारखेसाठी महाशिवरात्रीचा मुहूर्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:36 IST

निवडणूक आयोगाकडे लक्ष : प्रभागरचनेला मिळाली मंजुरी

पंकज पाटील

अंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रभाग रचनेतील त्रुटी दूर करुन त्याला रितसर मंजुरी मिळणे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची तारीख निश्चित करण्यात येत आहे. या संदर्भात महाशिवरात्रीला आदेश येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग रचनेची अधिसूचना निघताच आरक्षणाची तारीखही निश्चित होणार आहे.

१८ फेब्रुवारीला अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र प्रभाग रचनेलाच मंजुरी न मिळाल्याने ही आरक्षण सोडत झालीच नाही. मात्र रद्द करण्यात आलेली सोडत पुन्हा कधी होणार याची निश्चित तारीख स्पष्ट केली नव्हती. निवडणूक आयोगाने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या प्रभाग रचनांची पडताळणी केल्यावर त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पुढची आरक्षण सोडतीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर झाल्यावर त्या सोबत आरक्षण सोडत निश्चित होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आरक्षण सोडतीची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यासोबत त्या सोडतीला येणाऱ्या हरकतींची सुनावणी घेण्यासाठीही निश्चित वेळ ठरविण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १८ मार्च उजाडणार हे निश्चित मानले जात आहे. हरकती आणि त्यांच्यावरील सुनावणी याला वेळ मर्यादा असल्याने ही प्रक्रिया लांबणार आहे.प्रचारासाठी वेळ मिळणार कमीप्रभाग रचना निश्चित झाल्यावर लागलीच आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग निश्चिती आणि आचारसंहिता यांच्यातील अंतर कमी राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे.यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे