शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Vidhan Sabha 2019: पराभव चाखलेले नऊ आमदार यावेळी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:58 AM

‘त्या’ माजी आमदारांमध्ये गणेश नाईक, दौलत दरोडा, गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा समावेश

- सुरेश लोखंडे ठाणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या निवडणुकीकडे दृष्टिक्षेप टाकला असता जिल्ह्यातील तत्कालीन नऊ आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती. या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत ते आहेत.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह नऊ माजी आमदार या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. या माजी आमदारांना निवडणूक रिंगणात उतरवल्यास, ते विजयश्री मिळवतील की नाही, याची चाचपणी पक्षश्रेष्ठी करत आहेत. या माजी आमदारांपैकी बहुतांश नेते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते.गेल्या निवडणुकीत भाजपचे सात व शिवसेनेचे सहा आमदार, तर राष्टÑवादीचे चार आणि अपक्ष आमदार गणपत गायकवाड विजयी झाले होते. त्यापैकी भाजपचे दोन विद्यमान तर पाच प्रथमच, शिवसेनेच्या चार विद्यमानसह दोन नव्याने आणि राष्टÑवादीच्या दोन विद्यमानसह दोन आमदार नव्याने विजयी झाले होते. गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी एक हजार ४९१ मतांनी पराभव केला होता. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाची भाजपची जागा शिवसेनेने, तर ठाण्याची शिवसेनेची जागा भाजपचे संजय केळकर यांनी आपल्याकडे खेचली.गेल्या निवडणुकीत सेनेचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा पराभूत होऊन राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा निवडून आले होते. आता बरोरा सेनेत दाखल झाल्यामुळे सेनेत बंडखोरी होण्याचे चिन्हे आहेत. या मतदारसंघात राष्टÑवादीचे मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे राष्टÑवादी उमेदवाराची चाचपणी करत आहे. भिवंडी (प.) चे समाजवादीचे अब्दुल रशीद ताहीर मोमीन, कल्याण (प) मधील प्रकाश भोईर, उल्हासनगरमधील भाजपचे कुमार आयलानी, कल्याण ग्रामीण मनसेचे रमेश पाटील पराभूत झालेले आहेत.मीरा-भार्इंदरमधील राष्टÑवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा पराभूत झाले होते. भिवंडी ग्रामीण येथून निवडणूक लढविण्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीने भाजपचे विद्यमान आमदार विष्णू सवरा यांनी विक्रमगडमधून निवडणूक लढवली. ते येथे विजयी झाले. पण, यामुळे भिवंडी ग्रामीणची जागा भाजपने गमावली होती. चार जागांऐवजी भाजपने तीन जागा जास्त प्राप्त करून सात जागांवर विजय मिळवला होता.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत २४ पैकी सर्वाधिक पाच जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. भिवंडी (पूर्व) मध्ये अबू आझमी विजयी झाले होते. त्याचवेळी ते मानखुर्द येथूनही निवडून आले होते. त्यांनी भिवंडी पूर्वच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे या जागेसाठी पुन्हा निवडणूक झाली असता, सेनेचे रूपेश म्हात्रे निवडून आल्यामुळे सेनेच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या सहा झाली होती.याशिवाय एनसीपी, भाजपच्या प्रत्येकी चार आमदारांसह सीपीएम, मनसे, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष यांचे प्रत्येकी दोन आमदार २००९ मध्ये विजयी झाले होते. काँगे्रसचे उमेदवार राजेंद्र गावित पालघरमधून निवडून आले होते. गेल्या निवडणुकीला पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांतून काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी राहील, हा चर्चेचा विषय आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस