Vidhan Sabha 2019: भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:42 PM2019-09-24T23:42:46+5:302019-09-24T23:43:12+5:30

सेनेचा मतदारसंघ; भाजपची मोर्चेबांधणी

Maharashtra Vidhan Sabha 2019 Competition for party entry in BJP and Congress | Vidhan Sabha 2019: भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा

Vidhan Sabha 2019: भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा

Next

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना अंबरनाथमध्ये सहा महिन्यानंतर येणाऱ्या पालिका निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून अनेक पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश देण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसच्यावतीने देखील काही पदाधिकाºयांसह स्वाभिमानी सघटनेच्या पदाधिकाºयांचा प्रवेश करण्यात आला आहे. या पक्षप्रवेशाच्या स्पर्धेमुळे विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यातच अंबरनाथ पालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई येथे भाजपच्या वतीने अंबरनाथच्या काही पदाधिकाºयांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. भाजपचे स्थानिक नेते गुलाबराव करंजुले यांच्या नेतृत्वाखाली माजी अपक्ष नगरसेवक मुक्कू लेनीन, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा निलीमा नायडू, शिवसेना नगरसेवकाचे वडील राजा महाडीक, रिंकू गारुंगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, काँग्रेसनेदेखील पक्ष संघटना बळकट करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे राहुल सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर यांचा पक्ष प्रवेश करत त्यांच्यावर शहराची जबाबदारी सोपवली आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी, स्पर्धा मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये लागली आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेला समांतर ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

शिवसेनेचे काही नगरसेवक फोडण्याचाही प्रयत्नही भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपच्या या रणनितीला अद्याप शिवसेनेने प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र काँग्रेस आपल्या परिने ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेची ताकद सर्वाधिक असली तरी, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न आपआपल्या परिने करत आहे. निवडणुकीची रंगत जसजशी वाढेल, तसतशी ही स्पर्धा वाढणार आहे. त्यादृष्टीने सर्वच महत्त्वाचे पक्ष जास्तीत जास्त मासे आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Competition for party entry in BJP and Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.