शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:21 IST

Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती आहे. निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मतदानाची घसरलेली टक्केवारी ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघात यंदा ४१.७४ मतदान झाले. २०१४ मध्ये येथे ४४.९२ टक्के मतदान झाले होते. ते पाहता येथे ३.१८ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांत येथे मतदारांची संख्याही वाढली. मात्र, सोमवारी मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याने मतदानाचा टक्का वाढला नसल्याचे पाहायला मिळते.

मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणेसह कल्याण-डोंबिवली महापालिकेने जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती. मात्र, तिला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. तसेच जागृतीची मोहीम अनेक मतदारांपर्यंत पोहोचलीच नसल्याने मतदार बाहेर पडला नाही, असे कारण सांगितले जात आहे.

कल्याण पश्चिमेत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड, वाहतूककोंडी, पत्रीपूल या प्रमुख समस्या होत्या. या समस्या सुटाव्यात, यासाठी मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडून मतपेटीतून राग व्यक्त करतील, असा दावा केला जात होता. मात्र, मतदार बाहेर पडले नाहीत. मतपेटीतून त्यांना व्यक्त व्हावेसे वाटले नाही, ही बाब मतदानाची आकडेवारीच उघडपणे सांगत आहे.

त्याचबरोबर जनमानसात अशीही चर्चा निवडणुकीपूर्वी नेहमीच ऐकू येते ती म्हणजे मतदान कोणालाही करा, कोणीही निवडून येईल. तरी देखील समस्या तशाच राहील, त्यात काही फरक पडणार नाही. शहराच्या विकासात निवडणुकीमुळे कोणताच फरक पडत नाही, अशी एक प्रकारची हतबलताही मतदारांमध्ये घर करू लागली आहे. त्यामुळेच मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था आहे, हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. मतदानाची २१ आॅक्टोबर ही तारीख रविवारच्या सुटीला जोडून आली. त्यामुळे अनेकांनी शनिवार ते सोमवार असे सलग तीन दिवस अथवा सोमवारच्या सुटीचा फायदा घेत शहराबाहेर जाणे पसंत केले.

मी मतदान न करण्याने इतका मोठा फरक पडणार नाही, अशीही एक मानसिकता मोठ्या प्रमाणात उपनगरात वाढीस लागली आहे. तिचाही मोठा फटका मतदानाला बसला आहे. घटलेल्या मतदानाबरोबरच ‘नोटा’चे बटण दाबणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असण्याची शक्यता आहे.बहिष्कार नसतानाही झाले कमी मतदान

कल्याण ग्रामीण मतदारसंघातही रस्ते, वाहतूककोंडी, नागरी सुविधा, पाणी तसेच २७ गावांचा प्रश्न, अशा अनेक समस्या आहेत. २७ गावांतील मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. परंतु, येथे मतांच्या टक्केवारीत एक टक्का घट झाली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात २०१४ मध्ये ४७.९४ टक्के मतदान झाले होते. तर, यंदा येथे ४६.३७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा मतदानावर कोणाचाही बहिष्कारही नव्हता, तरी देखील मतदान एक टक्क्याने घटले. त्यामुळे येथील मतदारालाही मतदारसंघात बदल घडविण्यासाठी बाहेर पडावेसे वाटले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान