शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

Maharashtra Election 2019: स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही, सीआयएसएफ जवानांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 2:06 AM

Maharashtra Election 2019: उल्हासनगर मतदारसंघातील इव्हीएम मशीन प्रांत कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सीआयएसएफ जवानांचे संरक्षण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मुकदम यांनी दिली.

उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघातील इव्हीएम मशीन प्रांत कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सीआयएसएफ जवानांचे संरक्षण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मुकदम यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी मतादानाच्या दिवशी शेवटच्या तासात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी सायंकाळी आठनंतरही मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कधी नव्हे ४६.८९ टक्यांवर गेली. यापूर्वी ३८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले नव्हते.

उल्हासनगर मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत २४ टक्के तर पाचपर्यंत ३८ टक्के मतदान झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र पाचनंतर नागरिकांनी मतदानकेंद्रावर एकच गर्दी केली. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्यांना सायंकाळी सहा वाजता आतमध्ये घेत केंद्राचे प्रवेशद्बार बंद केले.

इव्हीएम मशीन व इतर साहित्य प्रांत कार्यालयात पोहचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री १२ वाजले. रात्री एकनंतर सर्व इव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले. स्ट्राँग रूमच्या आतबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रूमबाहेर सीआयएसएफ जवान, सीआरपीएफ जवानांचे कडे उभारण्यात आले. तर प्रवेशद्बारावर स्थानिक पोलिसांचे संरक्षण ठेवले आहे. मंगळावारी सकाळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक पथकाने निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.

मुकदम यांनी मंगळवारी दुपारी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये उमेदवार व त्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी पत्र देऊन स्ट्राँग रूम बाहेर व शेजारील मोबाइल टॉवरवर जॅमर लावण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी यांनी सकाळीच मुख्य पदाधिकाऱ्यांची बैेठक घेऊन निवडणुकीतील माहिती घेतली. भाजपचे कुमार आयलानी यांनीही पदाधिकाºयांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत माहिती घेतली. रिपाइंचे बंडखोर भगवान भालेराव यांनी सकाळी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

महिला कर्मचाºयांचे हाल, गोंधळ कायम

शेवटच्या तासात नागरिकांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी केल्याने बहुतांश मतदानकेंद्रावर रात्री आठपर्र्यंत मतदान सुरू होते. इव्हीएम मशीनसह इतर साहित्य प्रांत कार्याल्यात आणून ती जमा करण्यासाठी रात्रीचे बारा वाजले. यामध्ये महिला कर्मचाºयांना थांबविल्याने त्यांचे हाल झाले. सुदैवाने त्याठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती.

महाराष्ट्रात कमी मतदानाची नोंद उल्हासनगरमध्ये होते की काय? अशी परिस्थिती पाचेपर्यंत होती. मतदान आठनंतर सुरू असल्याने टक्केवारीत गोंधळ झाला. अखेर ४६. ८९ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पदरात पडणार अशी चर्चा सुरू झालीआहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019