नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने अपघातात दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 20:17 IST2020-06-06T20:15:39+5:302020-06-06T20:17:25+5:30

याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली. परंतु

The lost control on bike lost 2 their lives in the accident | नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने अपघातात दोघे ठार

नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने अपघातात दोघे ठार

ठाणे : भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह त्याच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी जेल तलावसमोरील उड्डाणपुलावर घडली. गोल्डन डाईज नाक्याकडून ठाण्याच्या दिशेने येताना भरवेगात नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने दोघेही जागीच गतप्राण झाले. दोन्ही मृतदेह सिव्हिल रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून, याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली. परंतु त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

दरम्यान, शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पूर्वद्रुतगती महामार्गावरील उत्सव हॉटेलसमोर दुचाकी अपघातग्रस्त होऊन दुचाकीस्वार मनोज कदम (40) आणि त्याच्यासोबत असलेली नेहा सुबोधरे (36) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे, अशी माहिती ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

Web Title: The lost control on bike lost 2 their lives in the accident