शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

आता होणार ‘लॉकडाउन वेडिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 1:05 AM

पेढे, गुलाबांची जागा घेणार सॅनिटायझर, मास्क : सेफ्टी अ‍ॅरेंजमेंटसह मंगल कार्यालयांची पॅकेजेस तयार

स्रेहा पावसकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनानंतर विवाह सोहळ्याच्या कार्यालयात प्रवेश करताना तुमच्यावर अत्तराच्या फवाऱ्याऐवजी सॅनिटायझरची फवारणी होईल. अक्षतांची जागा थर्मल स्क्रीनिंग घेईल. फुले, गजरे यांच्याऐवजी मास्क आणि हॅण्डग्लोव्हज दिले जातील. कारण लग्नाच्या इव्हेंटचे आयोजन करणाऱ्यांनी ‘लॉकडाउन वेडिंग’ ही संकल्पना प्रचलित केली आहे.

लॉकडाउनमुळे रखडलेली लग्ने लॉकडाउन उठल्यानंतर करण्याच्या विचारात असलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांनी हा नवा अफलातून पर्याय शोधला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मार्चमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला. सामूहिक सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे मार्चपासून नियोजित असलेले अनेक लग्नसोहळे रद्द झाले. काहींनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लग्न उरकलीत.

आता लॉकडाउनचे नियम हळूहळू शिथिल होत असून सामूहिक सोहळ्यांना नियमावलींसह परवानगी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. विवाह, साखरपुडा असे सोहळे अनेकांनी पुढे ढकलले आहेत. मात्र ‘आता थांबायचा विचार करू नका’ किंवा ‘आपल्या आयुष्यातला सुंदर क्षण साजरा करायला मागे हटू नका’ अशा टॅगलाइन देत कमी माणसांमध्ये कौटुंबिक सोहळा शासनाच्या नियम, अटी पाळत साजरा करण्याचा नवा पर्याय मंगल कार्यालय व्यवस्थापनाने कौटुंबिक समारंभ आयोजित करणाºयांसाठी ठेवला आहे. तसे पॅकेज आणि त्याच्या जाहिरातीही तयार केल्या आहेत. लॉकडाउन सोहळ्यांच्या पॅकेजमध्ये सेफ्टी अ‍ॅरेंजमेंटला अधिक महत्त्व दिले आहे. यात कार्यालयाचे सॅनिटायझिंग, उपस्थितांसाठी मास्क, प्रत्येकाचे थर्मल चेकिंग, सॅनिटायझरची सोय, हात धुण्याची सोय असेल. तसेच सोशल डिस्टन्सिंंगही पाळले जाईल, असे नमूद केले आहे.

समारंभ हा फक्त ५० माणसांमध्ये साजरा करण्याचे बंधन असले तरी सर्व आप्तेष्टांना ई-वेडिंग कार्डस् तसेच डिजिटल अ‍ॅपद्वारे हा सोहळा पाहण्याची आणि त्यात आॅनलाइन सहभागी होण्याची सोयही पॅकेजमध्ये दिलेली आहे. मोठ्या कार्यालयात आणि नटूनथटून विवाह, साखरपुडा करण्याची हौस या नव्या वेडिंग पॅकेजमुळे नक्की पूर्ण होऊ शकते.शासनाच्या नियम अटी पाळून या पॅकेजप्रमाणे सोहळे होऊ शकतात. इतर काही राज्यात याच नियमांनी सोहळे होत आहेत. आपल्या ठाण्यात जेव्हा शासनाची अशा सोहळ्यांना परवानगी मिळेल. त्यानंतर या पॅकेजप्रमाणे फक्त ५० माणसांमध्ये कार्यक्रम करता येतील.- रोहित शहा, पार्टनर, टीपटॉप प्लाझा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस