शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

Lockdown News: प्रमाणपत्रासाठी मजुरांची डॉक्टरांकडून लूट; वैद्यकीय दाखल्यासाठी पैशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 00:01 IST

केवळ ताप, सर्दी, खोकला आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर एकेका मजुराकडून ३00 ते ४00 रुपये उकळत आहेत.

ठाणे : लॉकडाउनमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर अडकून पडले आहेत. राज्य सरकारने परराज्यांतील मजुरांना गावी पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध कागदपत्रे जमविण्याची मजुरांची धावपळ सुरू झाली आहे. अशावेळी झोपडपट्ट्यांमध्ये दुकाने थाटून बसलेल्या काही डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी मजुरांची आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडू लागले आहेत.

देशात लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे मजूर, कामगार, पर्यटक विविध राज्यांत अडकून पडले आहेत. त्यांची अडचण लक्षात घेता केंद्राने राज्यांच्या मदतीने त्यांना त्यांच्यात्यांच्या राज्यांत पाठवण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र सरकारदेखील या कामात गुंतले आहे. त्यानुसार, ठाण्यातही मजुरांची अर्ज भरून नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

अर्जासोबत मजुरांना त्यांच्या गावचा पत्ता, आधारकार्ड झेरॉक्स, डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जमवावी जात आहेत. त्याकरिता गरजू मजुरांची इतर कागदपत्रांसह डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. रुग्णांवर उपचार करताना आपणासही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने झोपडपट्टी भागातील अनेक डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद करून घरी बसले होते. ते आता मजुरांना प्रमाणपत्र देण्यासाठी दवाखाने उघडू लागले आहेत.

केवळ ताप, सर्दी, खोकला आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर एकेका मजुराकडून ३00 ते ४00 रु पये उकळत आहेत. गावी जाण्यासाठी आतुरलेले हे गोरगरीब डॉक्टरांकडून होणारी पिळवणूक अगतिकपणे सहन करत आहेत.डॉक्टरची पोलीस ठाण्यात वरातठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एमआयडीसी असून, त्यामुळे परराज्यांतील मजुरांचे या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या भागातही वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी डॉक्टरांकडून मजुरांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू आहे. त्यामुळे चिडलेल्या काही लोकांनी एका डॉक्टरची चक्क वागळे इस्टेट पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली. मात्र, त्याने मधूनच पळ काढल्याचे काही मजुरांनी सांगितले. पालिकेच्या आरोग्य विभागासह पोलिसांनी या घटनांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.कोरोनासारख्या भीषण संकटाच्या काळातही गोरगरिबांना लुटणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी आर्थिक लूट, हादेखील त्याचाच एक भाग आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस