शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

विधी व न्याय विभागाने धाडले न्यायालयाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:12 IST

राकेश पाटील हत्या प्रकरण : विशेष सरकारी वकील नेमण्याची केली हाेती मागणी

अंबरनाथ : मनसेचे उपशहरप्रमुख राकेश पाटील यांंच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी राकेश पाटील यांच्या भावाने केली होती. या प्रकरणी विधी व न्याय विभागाने या पत्राच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयाकडे पाठविले आहे.डी. मोहन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जैनम रेसिडेन्सी परिसरात राकेश पाटील यांंची २८ ऑक्टोबर रोजी हत्या केली होती. या हत्येनंतर काही आरोपी लागलीच पकडले गेले. 

मात्र, डी. मोहन आणि त्याच्यासोबतचे आणखी दोन आरोपी फरार झाले होते. त्यांना पनवेल येथून अटक करण्यात आली. या हत्येतील सर्व मारेकरी अटकेत असून त्यांना न्यायालयाने योग्य शासन द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. १३ नोव्हेंबरला राकेश याचा भाऊ अजय पाटील याने राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पत्र देत या हत्या प्रकरणात आरोपींचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. संजय बी. मोरे या विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी केली.  या पत्राची दखल घेत शासनाने हे पत्र ठाणे जिल्हा न्यायालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. त्यामुळे पाटील कुटुंबीयांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील मिळणार किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान , शुक्रवारी आराेपींना न्यायालयात हजर केले तेव्हा संतप्त झालेल्या राकेशच्या कुटुुंबीयांनी आराेपींच्या दिशेने चप्पल भिरकावली हाेती.

टॅग्स :thaneठाणे