शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंतांना डावलून भाजपने दिली उपऱ्यांना ‘परिवहन’मध्ये संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:15 IST

निष्ठावान नाराज असल्याने दगाफटका होण्याची शक्यता

ठाणे : ठाणे परिवहन समितीमध्ये १२ सदस्य निवडून जाणार असले तरी, त्यासाठी १४ जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात भाजपला एका जागेवर रोखण्यासाठी राष्टÑवादी आणि शिवसेनेची खलबते सुरू आहेत. दुसरीकडे भाजपकडून दोन सदस्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, हे दोन्ही सदस्य इतर पक्षांतून आलेले असल्याने परिवहनमध्ये जाऊ इच्छिणाºया निष्ठावंतांच्या आशेला सुरुंग लागला आहे. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर असून याचे परिणाम मतदानाच्या दिवशी या दोन उमेदवारांना भोगावे लागण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.ठाणे परिवहन समितीच्या सदस्यपदाची निवडणूक ४ मार्च रोजी होणार आहे. यासाठी १२ सदस्य निवडून जाणार असले, तरी १४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या वतीने सुरेश कोलते आणि विकास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, कोलते हे मनसेतून आणि विकास पाटील हे काँग्रेसमधून आल्याचे निष्ठावंतांचे म्हणणे आहे. आधीच शहर पातळीवरीलदेखील निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी दिल्याने निष्ठावंतांमध्ये काहीशी नाराजी आहे.२०१७ मधील महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षात अनेक इच्छुक असताना उपºयांना संधी देत नगरसेवकाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर, आता अर्ध्याहून अधिक पक्ष उपºयांच्या हाती सोपविण्यात आला आहे. त्यामुळेही पक्षात काहीशी नाराजी आहे. त्यात आता परिवहनमध्ये पक्षातील निष्ठावान नगरसेवकांजवळ असलेल्या ८ ते १० जणांनी परिवहनमध्ये जाण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. परंतु, त्यांना डावलून पक्षाने पुन्हा उपºयांना संधी दिल्याने त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे परिणाम मतदानाच्या दिवशी होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. मतदान करताना एका नगरसेवकाला १२ मते एकाला किंवा १२ सदस्यांना वाटून देता येणार आहे. असे झाल्यास नाराज निष्ठावंतांकडूनच भाजपच्या उमेदवारांना दगाफटका सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ याबाबत काय काळजी घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपा