शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोलशेतची बस अखेर सुरू

By admin | Updated: December 29, 2015 00:56 IST

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ठाणे स्टेशन ते कोलशेत या ९५ क्रमांकाच्या मार्गावर धावणारी बस पुन्हा कापूरबावडी मार्गावरूनही धावणार असल्याने ज्या पाच बस थांब्यांवरील बहुसंख्य

- जितेंद्र कालेकर, ठाणेठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ठाणे स्टेशन ते कोलशेत या ९५ क्रमांकाच्या मार्गावर धावणारी बस पुन्हा कापूरबावडी मार्गावरूनही धावणार असल्याने ज्या पाच बस थांब्यांवरील बहुसंख्य प्रवाशांची गैरसोय झाली होती, त्यांना दिलासा लाभला आहे. प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच परिवहन प्रशासनाने सर्वेक्षण करून आता कापूरबावडी आणि टेकसन या दोन्ही मार्गांवर ही बस सुरू केली आहे. ‘टीएमटीच्या प्रवाशांना फटका : कोलशेत बसचा मार्ग बदलला : अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याने घेतले फैलावर’ या मथळ्याखाली ७ डिसेंबरच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रवाशांच्या मागणीनुसार आता टेकसनमार्गे ठाणे स्टेशन ते कोलशेत आणि कापूरबावडीमार्गे ही ठाणे स्टेशन ते कोलशेत अशा दोन्ही मार्गांवर सुरू ठेवण्याचे आदेश परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिले आहेत.प्रशासनाच्या सर्व्हेनुसार टेकसनमार्गे ठाणे स्टेशन ते कोलशेत जाणाऱ्या बसच्या एका फेरीतून चार हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळते तर कापूरबावडी हायलॅण्डमार्गे कोलशेतकडे जाणाऱ्या याच बसच्या एका फेरीतून एक हजारांचे जादा म्हणजे पाच हजार ४०० इतके उत्पन्न मिळते. उत्पन्नात साधारण २० ते २५ टक्के इतकाच फरक असल्याने टीएमटी प्रशासनाने टेकसनमार्गे तीन तर हायलॅण्ड कापूरबावडीमार्गे तीन अशा फेऱ्या सुरू केल्या आहेत. कापूरबावडीमार्गे जादा उत्पन्न आणि प्रवासीही जादा असल्याने या मार्गावर कालांतराने फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कापूरबावडीमार्गे जाणारी क्र. ९५ ही बस पाच थांबे वगळून टेकसन कंपनीमार्गे ढोकाळी-कोलशेत अशी सुरू केली. कोलशेतला जाणाऱ्या काही प्रवाशांनी वेळ वाचविण्यासाठी ही बस शॉर्टकट मारून अन्य मार्गाने घेण्याची मागणी केली.