शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

लाल परीमध्ये पुन्हा खटखट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण एसटी डेपोतून दररोज २५ हजार प्रवासी प्रवास करतात. या डेपोतून लांब पल्ल्यांसह शहरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण एसटी डेपोतून दररोज २५ हजार प्रवासी प्रवास करतात. या डेपोतून लांब पल्ल्यांसह शहरी भागात बसेस चालविल्या जातात. कोरोनाचा फटका या बस डेपोला बसल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यात तिकिटांची इलेक्ट्रॉनिक मशीन्स बंद असल्यावर ट्रेचा वापर करून प्रवाशांना तिकीट वितरित करण्यासाठी वाहकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

कल्याण बस डेपोत इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन्स बंद असल्याचे प्रमाण कमी आहे. १८६ पैकी ४० मशीन्स बंद आहेत. मात्र त्यांची दुरुस्ती करून घेतली जाते. मशीन बंद पडल्यावर ट्रेचा वापर करून तिकीट दिले जाते. मशीन्स बंद पडल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला नसल्याचे डेपो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अनलॉक सुरू असतानाही प्रवासी संख्या घटली होती. मात्र, आता कुठे ती वाढत आहे. त्यामुळे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. तिकीट मशीन्स जेव्हा बंद होतात, तेव्हा प्रवासी तिकिटे देताना ट्रेचा वापर करणे गर्दीच्या वेळी शक्य होत नाही. त्यामुळे काही वेळेस हिशेब जुळून येत नाही. तसेच वाहकांना आता मशीनची सवय लागली आहे. मशीन बंद असल्यास तिकिटे दिल्यानंतर, तो तिकिटांचा चार्ट भरावा लागतो. मात्र, हे काम आता वाहकांना कंटाळवाणे वाटत आहे.

---------------------------------

कल्याण एसटी डेपोतील एकूण बसेस - ७०

सध्या सुरू असलेल्या बसेस - ६०

तिकिटे काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन्स - १८६

सध्या बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन्स - ४०

ट्रेचा वापर हा मशीन बंद पडल्यास करायचा आहे. त्यामुळे ट्रे सगळ्य़ांनाच दिला जातो.

-----------------------------------

दुष्काळात तेरावा महिना

कल्याण बस डेपो दिवसाला नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत होता. कोरोना काळात डेपोला दिवसाला साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला असून, केवळ पाच लाख रुपयेच उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे डेपोचे उत्पन्न बुडाले आहे. महिन्याला डेपोला एक कोटी पाच लाख रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

-----------------------------------

...तर पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव

वाहकांना पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. कल्याण डेपोतील वाहकांच्या संख्येनुसार १८६ इलेक्ट्रॉनिक मशीन्स आहेत. मात्र त्यापैकी ४० मशीन्स बंद आहेत. त्यामुळे ४० वाहकांना हा त्रास सहन करावा लागतो. ट्रेचा वापर करत असताना तिकिटे आणि पैशाची जुळवाजुळव करावी लागते. बसमध्ये गर्दी असल्यास अनेकदा ही जुळवाजुळव करणे शक्य नसते. मात्र गर्दी कमी झाल्यावर, परतीचा प्रवास करीत असताना वाहक त्यांचा हिशेब मांडत बसतो.

-----------------------

कर्मचाऱ्यांना मिळाला पगार

देशात कोरोनाचे संकट मार्च २०२० मध्ये आले. त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनचा फटका एसटी डेपोंनाही बसला. राज्यातील सर्व ठिकाणची प्रवासी वाहतूक बंद होती. मात्र, पालघर, मुंबई आणि ठाणे डेपोतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि डॉक्टर, नर्सेस यांच्यासाठी एसटी बसेस सोडल्या जात होत्या. त्यामुळे या डेपोतील कर्मचाऱ्यांसह राज्यातील अन्य डेपोतील कर्मचाऱ्यांना पगार मिळाला. काही वेळा तो उशिराने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला.

----------------------------------

एसटी महामंडळाने वाहकांना तिकिटासाठी ट्रायमॅक्स कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक मशीन्स पुरविल्या आहेत. महामंडळाने त्यासाठी कंपनीशी केलेला करार संपुष्टात आला आहे. ही महामंडळाची बाब धोरणात्मक असल्याने त्यावर अधिक भाष्य करता येत नसले तरी, नादुरुस्त मशीन दुरुस्त केल्या जातात. पर्यायी व्यवस्था म्हणून सगळ्याच वाहकांना ट्रे दिले जातात. त्यामुळे मशीन बंद असल्यास फारशी अडचण येत नाही.

- विजय गायकवाड, व्यवस्थापक, कल्याण बस डेपो.

--------------