शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईत विष कालवून शेकडोंना मारतो, अन्यथा खंडणी दे! हलवायाला धमकी देणाऱ्या दोघांना अटक 

By जितेंद्र कालेकर | Updated: September 10, 2024 00:11 IST

मिठाईवाल्याने खंडणी दिली नाही तर त्याच्या मिठाईत विष कालवून ती वाटून शेकडाे लोकांना ठार करण्याचीही धमकी या दोघांनी दिली होती.

ठाणे : कोपरीतील मिठाई व्यापाऱ्याला ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या विशाल ऊर्फ बाळासाहेब भोसले (४०) आणि कडुबा महादू तेलुरे (६०) या दोघांना कोपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ८० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी सोमवारी दिली. मिठाईवाल्याने खंडणी दिली नाही तर त्याच्या मिठाईत विष कालवून ती वाटून शेकडाे लोकांना ठार करण्याचीही धमकी या दोघांनी दिली होती.

विशाल याने तक्रारदार मिठाई व्यापाऱ्याला ६ ते ८ सप्टेंबर २०२४ दरम्यान मोबाइलवर फोन करून ५० हजारांच्या खंडणीची मागणी केली. तू मला ५० हजार रुपये दिले नाहीतर तुझ्या दुकानातून मिठाई खरेदी करून ती सुमारे पाचशे ते एक हजार लोकांना खाऊ घालून मारून टाकेन, अशी धमकी दिली. ठाण्यात चालणाऱ्या गँग माझ्याच भरोशावर चालतात. तू ५० हजार रुपये दिले तर तुझ्या जिवाला धोका नाही. पन्नास हजार रुपये दिले नाहीतर तुझ्या जिवाला धोका असल्याचीही धमकी त्यांनी दिली. यातील आरोपी विशाल हा २०१९ ते २०२३ पर्यंत कोपरी येथील व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करायचा. व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार पैसे स्वीकारताना कळव्यातील कडूबा याला आणि मागणी करणाऱ्या कोपरीमधील विशाल अशा दोघांना सापळा रचून पोलिसांनी ८ सप्टेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतले. विशाल आपण समाजसेवक असल्याचाही दावा करताे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कुमार पानसरे हे अधिक तपास करीत आहेत.तर व्यापाऱ्यांनी तक्रार करावी-या खंडणीबहाद्दरांनी अनेक व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्याच्या तक्रारी आता उघड होत आहेत. ज्या व्यापाऱ्यांकडे या दोघांनी खंडणीची मागणी केली, त्यांनी कोपरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डेरे यांनी केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस