शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यामुळे केडीएमसीची घसरगुंडी सुरूच...

By admin | Updated: February 16, 2016 02:40 IST

केंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे

मुरलीधर भवार,  कल्याणकेंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे. या सर्वेक्षणामुळे कचऱ्याच्या बाबतीत महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिका कचऱ्यामुळे वारंवार गोत्यात आली असून कचऱ्याच्या अव्यवस्थापनामुळे महापालिकेची घसरगुंडी सुरूच आहे. ती कशी काय सावरणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे. महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत तळाला गेल्याचे जाहीर होताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला गेला नाही. त्यात दिरंगाई झाली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी देताना एप्रिल २०१५ मध्ये शहरातील नव्या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यास स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कायम आहे. या स्थगितीपश्चात महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी निविदा काढली आहे. या महिनाअखेर हे डम्पिंग ग्राउंड बंद केले जाणार आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी १० टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. बारावे येथे भरावभूमी विकसित करण्यासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. उच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात महापालिकेने धाव घेतली आहे. स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा उपायुक्त पवार यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)महापालिकेत १९९७ पासून सफाई कामगारांची भरतीच झालेली नाही. सध्या कचरा वाहतूक करण्यासाठी १५० वाहने आहेत. तसेच २ हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून दररोज कचरा उचलला जात आहे. आणखीन साडेपाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.कचरा उचलणाऱ्या ३०० वाहनांची आवश्यकता आहे. चार प्रभागांत कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी गेल्या महिन्यात ठराव मंजूर करण्यात आला आहे. २७ गावे महापालिकेत आली. त्या ठिकाणचे २०० कर्मचारी महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. शहरातून दररोज ५७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो. २७ गावांतून ७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो.