शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

कसारा घाट 10 तास विस्कळीत, पोलीस प्रशासनावर ताण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 4:28 PM

मुंबई नाशिक महामार्ग वरील विघ्न अजून ही कायम आहे. कसारा घाटातील जुना घाटात दरडी पडणे व रस्ता खचणे सुरु असतानाच नवीन घाटात देखील काही ठिकाणी तडे गेले

कसारा  -  मुंबई नाशिक महामार्ग वरील विघ्न अजून ही कायम आहे. कसारा घाटातील जुना घाटात दरडी पडणे व रस्ता खचणे सुरु असतानाच नवीन घाटात देखील काही ठिकाणी तडे गेलेत परिणामी मुंबई कडे येणारी व नाशिक कडे जाणारी वाहतूक नवीन घाटातून सुरु असताना मोठ्या प्रमाणावर ताण नवीन घाटावर पडला आहे अवजड वाहने, लहान कार यांची एकच गर्दी या नवीन घाटात होतं असताना आज पहाटे 2:30 मिनिटांनी नवीन कसारा घाटातील दोन ठिकाणी वळणावर तीन ते चार  ट्रक, कन्टेनर, बंद पडल्याने सुमारे 10 तास महामार्ग वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.    महामार्ग विस्कळीत झाल्याचे समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय भोये, महामार्ग घोटी टॅप चे अधीकारी सागर डगळे आपल्या कर्मचाऱ्या समवेत घाटात  दाखल झाले परंतु घाटातील नाग मोडी वळणावर अवजड वाहने बंद पडल्याने व इगतपुरी च्या दिशेकडे व कसाराच्या दिशेकडे वाहनाच्या रांगा लागल्याने बंद गाड्या काढण्यासाठी क्रेन आणण्यास अडचणी निर्माण होत होत्या त्यात लहान गाड्या अस्ताव्यस्त घुसल्याने पोलीस प्रशासनास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.अखेर बंद असलेल्या जुन्या घाटातील दरडी काही प्रमाणात बाजूला करुन लहान गाड्या जुन्या घाटातून काढण्यात आल्या त्यानंतर पोलीस प्रशासनाने क्रेन साठी रस्ता तयार करीत कसेबसे क्रेन नवीन घाटात आणले व वळणावर बंद पडलेले वाहने हटवले तब्बल 8 ते 10 तासाच्या अथक परिश्रमांनंतर  पोलीस प्रशासनास घाट सुरळीत करण्यात यश आले मात्र या दरम्यान पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्ये खुप हाल झाले.  एकी कडे पाऊस तर एकीकडे घाटातील विघ्न यामुळे वाहनचालक व बस, कार मधील प्रवाशी घाटात अडकून पडल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.   

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसPoliceपोलिस