शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात अनागोंदी कारभार

By admin | Updated: November 10, 2016 03:10 IST

कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. गंभीर रुग्णांवर वरिष्ठ डॉक्टरऐवजी शिकाऊ डॉक्टरच उपचार करत असल्याची बाब पुढे आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ. दिलीप कणसे यांचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. ते राहत असलेल्या रुग्णालयाच्या वसतिगृहात एका बादलीत डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची माहिती आता समोर आली आहे. २३ आॅक्टोबरला महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती झाल्यानंतर त्यांचे एक पथक तेथे गेले होते. त्यानंतर, त्यांनी येथील डेंग्यूच्या अळ्या नष्ट केल्या होत्या. परंतु, त्याआधीच कणसे यांना डेंग्यूची लागण झाली, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे त्यांना २४ आॅक्टोबरला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे योग्य उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या प्रकारामुळे आता तेथे चांगल्या प्रतीचे उपचार मिळत नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. येथे जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळत नसताना आता एका डॉक्टरवरही तीच वेळ ओढवल्याचीही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. रुग्णालयात बुधवारी सकाळी ११च्या सुमारास आलेल्या अनेक रुग्णांना वॉर्डबॉयच जागेवर नसल्याचा अनुभव आला. यावेळी दोन तासांहून अधिक काळ रु ग्णांना ताटकळावे लागले. त्यात गंभीर रुग्णही होते. अशा रुग्णाला वॉर्डमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरच उपलब्ध नव्हते. तसेच रुग्ण अत्यवस्थ असल्याने त्याला आयसीयूशिवाय पर्याय नसल्याचा दावा करून त्यांना दाखल करून घेण्यास सुरुवातीच्या काळात टाळाटाळ झाली. अखेर, रुग्णाच्या नातेवाइकांनी विनंती केल्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेतल्यानंतर रुग्णाला दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर, त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध असतानाही शिकाऊ डॉक्टरांनी उपचार सुरू केले. वरिष्ठ डॉक्टरांबाबत चौकशी केल्यानंतर ते उपलब्ध नसल्याची माहिती येथील कर्मचारी देत होते. कळवा रु ग्णालयात रोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांसह जिल्ह्याच्या विविध भागांतून बाह्यरुग्ण विभागात ५०० च्या आसपास रुग्ण येतात. परंतु, केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांकडे क्रमांक लागेपर्यंत एकेका रु ग्णाला चार ते पाच तास लागतात. त्यातही अनेकदा डॉक्टरही नसतात. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. आजही सकाळच्या वेळेत हाच अनुभव रु ग्णांना आला. परंतु, आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशा मानसिकतेत असलेल्या कर्मचारी अथवा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा कोण उगारणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.