अवघ्या ११ दिवसात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:10 IST2020-10-12T14:10:09+5:302020-10-12T14:10:25+5:30
CoronaVirus in Thane: मृत्युदर २. ६४ टक्के , एप्रिल ते सप्टेंबर्पयत ९९५ जणांचा मृत्यू

अवघ्या ११ दिवसात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिका पातळीवर विविध स्वरुपाचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८ टक्यांवर आले आहे. तर दुसरीकडे मृत्युदर हा २.६४ टक्यांवर आला आहे. परंतु मागील ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यानुसार आतार्पयत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे.
मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्ट शिवाय सप्टेंबर महिन्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसली आहे. सप्टेंबर महिन्यात १० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी ८ हजाराहून अधिक रुग्ण बरे देखील झाले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आतार्पयत ४० हजार ८६१ केसेस आढळल्या आहेत. त्यातील ३६ हजारांच्या आसपास रुग्ण बरे झाले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणा:यांची संख्या ही ३६४३ एवढी आहे. त्यानुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८.२० टक्यांवर आले आहे. राज्याच्या आणि मुंबईच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतर शहरांच्या तुलनेत ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १० दिवसांवरुन ८८ दिवसांवर आला आहे, ही देखील पालिकेसाठी समाधानाची बाब मानली जात आहे.
दरम्यान आतार्पयत महापालिका हद्दीत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु सुरवातीला मृत्युदर हा ५.२० टक्यांच्या आसपास होता. तो आता २.६४ टक्यांवर आला आहे. राज्याचा मृत्युदर हा २.६६ टक्के असून ठाण्याने मृतुदरही रोखण्यात यश मिळविले आहे. तर ऑक्टोबरच्या अवघ्या ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
महिना रुग्ण मृत्यु
एप्रिल १७
मे १६०
जून ३१०
जुलै २४०
ऑगस्ट १३२
सप्टेंबर १११
१ ते ११ ऑक्टोबर ७१
-----------------
एकूण १०६६