शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

जेसल पार्क चौपाटीवर खत प्रकल्प

By admin | Updated: March 25, 2017 01:16 IST

पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर टाकण्यात येणाऱ्या सुमारे ५० किलो निर्माल्यापासून गांडूळ खताच्या निर्मितीचा प्रकल्प पालिकेने

भार्इंदर : पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर टाकण्यात येणाऱ्या सुमारे ५० किलो निर्माल्यापासून गांडूळ खताच्या निर्मितीचा प्रकल्प पालिकेने नुकताच सुरू केला. पालिकेच्या या पहिल्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा होत असतानाच असे प्रकल्प ठिकठिकाणी सुरू करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी केले. मीरा-भार्इंदर शहरांना खाडी व पश्चिम समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. यामुळे येथील काही ठिकाणी किनाऱ्यावर चौपाट्यांची निर्मिती झाल्याने अनेक पर्यटक तेथे फिरण्यासाठी येत असतात. काहीजण निर्माल्य तेथील पाण्यात टाकतात. यामुळे पाण्यातील जलप्रदूषणात वाढ होऊन त्यातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते. भार्इंदर पश्चिम व पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे येथे टाकण्यात येणाऱ्या निर्माल्यासह टाकाऊ वस्तू तसेच कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. पाण्यात टाकण्यात येणारे निर्माल्य जमा करण्यासाठी पालिकेने या चौपाट्यांवर छोटीशी जागा दिली आहे. हा कचरा उचलून चौपाटी स्वच्छ ठेवण्याची मोहीम पालिकेने अगोदरच सुरू केली असली, तरी साठणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा मानस पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अभय सोनावणे यांनी व्यक्त केला. त्याला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर जेसल पार्क चौपाटीला प्राधान्य देण्यात आले. येथे दररोज जमा होणाऱ्या सुमारे ५० किलो निर्माल्यापासून गांडूळ खताच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली. एका लहानशा जागेत सुरू केलेल्या प्रकल्पातील खत पालिकेच्या विविध उद्यानांतील झाडांसाठी वापरण्यात येते. त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या बाजूकडील मोकळ्या जागेत विविध प्रकारच्या पालेभाज्यांची लागवडही केली जाते. अशा प्रकारे वर्षाकाठी सुमारे दीड टन खताची निर्मिती होणार आहे. जमा होणाऱ्या निर्माल्यासह कचऱ्यातील अविघटन कचरा वेगळा करून उर्वरित विघटन कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येते. पालिकेच्या या स्तुत्य प्रकल्पाची प्रशंसा होत असली, तरी असे प्रकल्प इतर स्वच्छता निरीक्षकांनीसुद्धा ठिकठिकाणी सुरू करावे. तसेच नागरिकांनीही आपापल्या इमारतींतील छोट्याशा मोकळ्या जागेत असे प्रकल्प सुरू करून शून्य कचरा मोहिमेला सुरुवात करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (प्रतिनिधी)