शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी, तहसीलदार, नगरसेवकांची चौकशी करा

By admin | Updated: November 15, 2016 06:06 IST

पालघर नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी प्रियंका केसरकर यांच्यासह अन्य तीन मुख्याधिकारी, तहसीलदार, नगरसेवक, ठेकेदारानी संतोष

हितेन नाईक / पालघरपालघर नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी प्रियंका केसरकर यांच्यासह अन्य तीन मुख्याधिकारी, तहसीलदार, नगरसेवक, ठेकेदारानी संतोष रमाकांत पाटील यांची अभियंतापदी बेकायदेशीररित्या नियुक्ती करून संगनमताने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची चौकशी करावी. त्याचे विशेष लेखापरिक्षण करून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी शिफारस जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.सन २००६-०७ मध्ये पालघर नागरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता असताना नगरपरिषद अंतर्गत ठेका पद्धतीने तांत्रिक कामकाज करण्याच्या कामासाठी अभियंता नेमण्यासाठी निविदा न मागवता रमाकांत पाटील या व्यक्तीची बेकायदेशीररित्या नियुक्ती केली गेली होती. यासाठी विद्यमान नगरसेवक उत्तम घरत, अतुल पाठक इ. १८ नगरसेवकांनी शिफारसपत्रे दिली असल्याचे पुरावे माजी नगरसेवक मंगेश पाटील यांनी विभागीय कोकण आयुक्तांना सादर केले होते. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी संतोष पाटील यांची अभियंतापदी बेकायदेशीररित्या नियुक्ती केली गेली. त्याच्या संगनमताने अवैध बांधकामांना परवानगी देणे, नगररचना विभागाच्या परवानगी शिवाय बेकायदेशीर बांधकामांना परवानगी व इमारत पूर्णत्वाचे दाखले देणे आणि विकास शुल्काची वसुली न करता रकमेचा अपहार करणे आदी गैरव्यवहार करण्यात आले. याच कालावधीतील तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता, बिल्डर, व ठेकेदार यांनी संगनमताने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला असल्याबाबतची तक्र ार मंगेश पाटील यांनी विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केली होती.तत्कालीन मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी तक्रारीची दखल घेत संतोष पाटील यास काम करण्यास मज्जाव केला. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्नही काही नगरसेवकांनी सुरु केला होता. या संदर्भात मागील १० वर्षा पासून तक्रारदार मंगेश पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या लेखापरिक्षणातही आक्षेप घेण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी एस. एम. लोखंडे, प्रियंका केसरकर, पी. एस. पत्रे तसेच प्रभारी मुख्याधिकारी रमाकांत पाटील यांनी सन २००५ ते २००८ या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार व कामातील अनियामीता केल्याने त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा १९७९ नियम ४ नुसार विभागीय चौकशी करावी असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे कळविले आहे.