ठाण्यात सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने घराला आग, सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 18:28 IST2022-06-12T18:27:35+5:302022-06-12T18:28:18+5:30
Gas Cylinder Leak : या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यात सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने घराला आग, सुदैवाने जीवितहानी टळली
ठाणे : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने कॅसल मिल येथील नवनीत भारत सोसायटीच्या बी विंगमधील एका सदनिकेत आग लागल्याची घटना रविवारी दुपारी २.१४ वाजता घडली. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॅसल मिल नाका येथील नवनीत भारत सोसायटीच्या बी विंगमधील भारत भांडाले भाडेकरू असलेल्या खोली क्रमांक ४०४मधील भारत गॅसमधील सिलिंडरच्या नोझलमधून गॅस गळती झाल्याने सिलिंडरच्या वाहिनीला किरकोळ आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.