गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर माझ्याविरोधात लढावे; खा. श्रीकांत शिंदे यांचे अंबरनाथ येथे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 05:55 IST2026-02-16T05:54:53+5:302026-02-16T05:55:40+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांना ‘माजी’ करून टाकू, असे विधान मंत्री नाईक यांनी केले होते. त्याला डॉ. शिंदे यांनी येथे उत्तर दिले.

गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर माझ्याविरोधात लढावे; खा. श्रीकांत शिंदे यांचे अंबरनाथ येथे प्रत्युत्तर
अंबरनाथ : वनमंत्री गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर त्यांनी ठाणे किंवा कल्याणमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. त्यांना त्यांची जागा कळेल, असे प्रत्युत्तर खा. श्रीकांत शिंदे यांनी दिले. शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी नाईक यांच्यावर टीका केली.
भारताचा 'ई'शानदार विजय; पाकचा ११४ धावांवर चुराडा, टी-२० वर्ल्डकपमध्ये ९ पैकी ८ वेळा भारतच जिंकला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांना ‘माजी’ करून टाकू, असे विधान मंत्री नाईक यांनी केले होते. त्याला डॉ. शिंदे यांनी येथे उत्तर दिले. आम्ही लोकांच्या प्रेमावर निवडून आलो आहोत. आम्ही आजपर्यंत कधीही माजी आमदार किंवा माजी खासदार झालेलो नाहीत. मात्र, जे आमच्यावर आरोप करीत आहेत, त्यांच्या घरातील तीन सदस्य या आधीच ‘माजी’ झाले आहेत, याचा त्यांना विसर पडत चालला आहे.
एकनाथ शिंदे यांनी नवखे उमेदवार असलेले आनंद परांजपे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करून गणेश नाईक यांच्याच मुलाचा दोन वेळा पराभव केला आहे. त्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. स्वतः गणेश नाईक आणि त्यांचा मुलगा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांच्या नावापुढे देखील माजी आमदार लागले होते, याची त्यांनी जाणीव ठेवावी. त्यानंतरच आम्हाला आव्हान द्यावे, असे शिंदे म्हणाले.