शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

देवीच्या मूर्तींनाही बसला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:48 AM

रंगकामास उशिरा सुरुवात : मूर्ती सुकवण्यासाठी सुरु आहे कोळशाची भट्टी आणि हॅलोजनचा वापर

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : यावर्षीच्या अतिवृष्टीचा फटका देवीच्या मूर्तींनाही बसला आहे. आधीच कमी दिवस आणि त्यात पावसाच्या तडाख्यामुळे मूर्ती सुकवण्याकरिता मूर्तिकारांची तारेवरची कसरत सुरू आहे. पावसामुळे मूर्ती सुकत नसल्याने कोळशाची भट्टी आणि हॅलोजनचा वापर करून मूर्ती सुकवल्या जात आहेत. अनेक मूर्तिकारांनी मनुष्यबळ वाढवले आहे.नवरात्रोत्सव आठवडाभरावर आला आहे. मूर्तिकारांकडे अवघे पाच-सहा दिवस आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दिवसरात्र कोसळत असलेल्या पावसाचा फटका देवीच्या मूर्तींना बसला आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले की, देवीच्या मूर्तिकामास सुरुवात होते. मूर्ती साच्यातून काढून रंगकाम केले जाते. पावसाने थैमान घातल्याने मूर्ती सुकवण्यास मूर्तिकारांना नाना शक्कल लढवायला लागल्या आहेत. त्यामुळे अर्थातच रंगकामासही उशिरा सुरुवात झाली आहे. भाविकांना मूर्ती वेळेत पूर्ण करून देण्यासाठी काही मूर्तिकारांनी कामाचे तास वाढवले आहेत, तर काहींनी नेहमीपेक्षा दुपटीने मनुष्यबळात वाढ केली आहे. कोळशाची भट्टी मूर्तीखाली ठेवून तसेच, चारही बाजूंनी हॅलोजन लावून मूर्ती सुकवल्या जात आहेत.अनेकांनी शुक्रवारपासून रंगकामास सुरुवात केली आहे. मूर्ती पूर्ण सुकल्याशिवाय रंगकाम करता येत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. गणेश विसर्जन झाले की, ऊन पडते त्यामुळे मूर्ती बाहेर ठेवल्या तरी त्या लगेच सुकतात. यंदा मात्र उलट परिस्थिती असल्याची नाराजी मूर्तिकारांनी व्यक्त केली. बेस कलर, बॉडी टोन, कपड्यांचा रंग, मग दागिने रंगविणे अशा टप्प्यांत रंगकाम केले जाते. गणेशमूर्तीपेक्षा देवीच्या मूर्ती बारकाईने रंगवल्या जातात आणि तुलनेने ते काम अवघड असते, असे पल्लवी गावकर यांनी सांगितले.रंग महागल्याने मूर्तींच्या दरांत वाढरंग आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने गेल्या वर्षी १५ हजार रुपये दराने मिळणारी मूर्ती यंदा १८ ते २० हजार रुपये दराने मिळत आहे. कामगारांची मजुरी वाढली आहे. हल्ली मूर्ती बनविणारे कामगार मिळणे कठीण झाल्याने ते मागतील ती मजुरी द्यावी लागते. त्यामुळे दररोज ५०० रुपये मजुरी घेणारे कामगार हे ७०० ते १००० रुपये मागत असल्याचे गावकर यांनी सांगितले.यंदा हातात कमी दिवस असल्याने आणि पावसामुळे मूर्ती सुकण्यास खूप अडचणी येत असल्याने दरवर्षीपेक्षा यंदा कमीच प्रमाणात मूर्ती आणल्या आहेत.- अरुण बोरीटकर,मूर्तिकारपावसामुळे मूर्तीचा खर्च कमी आणि कोळशांचा खर्च जास्त आहे. मूर्ती सुकवण्यासाठी आतापर्यंत ७० किलो कोळसा लागला आहे.- पल्लवी गावकर,मूर्तिकार