शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

राजकीय फायद्यासाठी पाणी ताेेडणाऱ्यांची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 06:45 IST

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

ठाणे :  ‘एखाद्या विभागातून मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. करीतही नाही; पण पाण्याच्या टाकीसाठी निधी आणि जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते. मात्र, यापुढे राजकारणासाठी सर्वसामान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला तर मी त्यांची हाडे मोडेन,’ असा सज्जड इशारा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नाव न घेता आपल्या विरोधकांना रविवारी रात्री दिला. 

कळव्यातील वाघोबानगरमधील कारगील परिसरात २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येत्या महिनाभरात परिसरातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच या टाकीसाठी जागा देणारे आदिवासी, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह पालिकेचे अभियंता गोसावी यांचेही आव्हाड यांनी विशेष आभार मानले.

वाघोबानगरवासीयांनी पहिल्याच वेळी आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणले. त्यामुळेच या भागातील रहिवाशांसाठी पाणी, रस्ते अशा सर्वच मूलभूत सुविधा पुरविल्या जातील, त्यामुळे तुमच्या घरांच्या किमती निश्चितच वाढतील; परंतु आपली घरे विकून पुन्हा दुसरीकडे झोपड्या बांधू नका, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

 केवळ विकासाचे काममते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण आपण कधीच केले नाही; परंतु असे प्रकार भास्करनगर, पौंडपाडा भागात घडतात. व्हॉल्व्ह बंद करून, शौचालयांना लॉक लावण्याचे राजकारण मी केले नाही. लोक घाबरून मते देतीलही; परंतु त्यांचे आशीर्वाद मिळणार नाहीत. मात्र, असे कृत्य करणाऱ्यांची मी हाडे मोडेन, असे पत्रकांराशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेशशिवसेनेचे शाखाप्रमुख अंकुश गुरव, अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामअवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहुल सिंग, संदीप शर्मा, नीतेश गौड, राहुल दुबे  आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाण्याच्या टाकीसाठी जागा देणारे गणेश भगत यांचाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस