शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

असुरक्षितता असेल तर डॉक्टर काम कसे करतील?

By admin | Updated: March 25, 2017 01:11 IST

गेली अनेक वर्षे मूलभूत प्रश्नांकडेही दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डॉक्टरांकडे संपाशिवाय दुसरा उपाय नव्हता आणि नाही.

स्रेहा पावसकर / ठाणेगेली अनेक वर्षे मूलभूत प्रश्नांकडेही दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डॉक्टरांकडे संपाशिवाय दुसरा उपाय नव्हता आणि नाही. एखादा रुग्ण दगावला की, मृत्यू नैसर्गिक असतो, हे कोणी मान्य करत नाही. डॉक्टरचीच चूक मानून नातेवाइकांकडून त्याला मारहाण होते. मात्र,जेव्हा रुग्णाला एखाद्या अवयवाची किंवा रक्ताची गरज असते, तेव्हा हेच नातेवाईक कुठे जातात, अशी असुरक्षितता असेल तर डॉक्टरांनी काम करायचे कसे, असे सवाल प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विजय सुरासे यांनी उपस्थित केले.डॉक्टरही माणूसच आहे आणि रुग्णसेवेचे व्रत आम्ही स्वेच्छेने स्वीकारलेले असते. ज्ञान आणि उपलब्ध साधनांच्या आधारे रुग्णाला बरे करणे आम्हाला आवडते. मात्र, डॉक्टर हे देवासारखे असले, तरी देव नाहीत. प्रत्येक व्यवसायात चांगलीवाईट माणसे आहेत. अनेकदा रुग्णाच्या वाईट सवयींमुळे झालेला आजार, चुकीमुळे झालेला अपघात मृत्यूला कारणीभूत असतो, हे अनेकजण मान्य करत नाहीत. उलट, डॉक्टर आणि त्यातही निवासी डॉक्टर यांना लक्ष्य केले जाते. निवासी डॉक्टर हे २४ तासच नव्हे, तर कधीकधी ३६ तास सलग काम करतात. एकावेळी अनेक रुग्णांचा ताण त्यांच्यावर असतो. त्यांना सुट्या नसतात. खाजगी,कौटुंबिक आयुष्य त्यांना जगता येत नाही. त्यांच्या राहण्याची योग्य सोय नसते. मात्र, डॉक्टर ही राजकारण्यांची व्होटबँक नसल्याने आमच्या या प्रश्नांकडे शासन गंभीरपणे पाहत नाही, अशा शब्दांत डॉ.सुरासे यांनी खंत व्यक्त केली. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील, तर हॉस्पिटलमधील संवेदनशील विभागात विमानतळाप्रमाणे सुरक्षा असावी. सीआरपीएफचे जवान तैनात असावेत. सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांतील सोयीसुविधा अपग्रेड कराव्या आणि २४ तास उपलब्ध असाव्या. डॉक्टरांची संख्या वाढण्याकरिता भरती करावी. वैद्यकीय महाविद्यालयातील सीट वाढवाव्या. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर निर्बंध असावेत, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.