शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकपणा हेच माझे भांडवल

By admin | Updated: January 21, 2016 02:24 IST

मी गाण्याशी प्रामाणिक राहिले. जे गायले ते प्रामाणकिपणे गायले. तेच माझे भांडवल आहे. सारेगम मध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी दिली जातात.

ठाणे : मी गाण्याशी प्रामाणिक राहिले. जे गायले ते प्रामाणकिपणे गायले. तेच माझे भांडवल आहे. सारेगम मध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी दिली जातात. जे गाणे येत नाही ते गावे लागते. यात खरी परीक्षा असते. आपला प्रयत्न प्र्रामाणिकअसेल तर यश नक्की मिळते, असे पिंगा ग पिंगा गाणे फेम गायिका वैशाली माडे हिने ठाण्यात सांगितले. भारतीय जनता पार्टी आणि कोकण ग्रामविकास मंडळ यांच्यातर्फे शिवाईनगर येथे आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवात वैशालीची मुलाखत घेण्यात आली. छोट्या गावातून माझा गायकीचा खडतर प्रवास सुरू झाला असे सांगून ती म्हणाली की रसिकांनी दिलेल्या साथीमुळेच मी सारेगम जिंकू शकले. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करता यावी म्हणून चांगल्या कार्यक्रमांत सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधत असते. सारेगमच्या पहिल्या पर्वात अपयशी झाले असले तरी दुसऱ्या पर्वात यशस्वी झाले. यावेळी आम्हाला आयत्यावेळी गाणे दिले जायचे आणि त्याची तयारी करायला केवळ अर्धा तासच मिळत असे. पहिल्या पर्वात मिळालेल्या अनुभवामुळेच या आव्हानाला सामोरे जाता आले. सारेगमच्या पर्वात गझल प्रकारात सुन्यासुन्या मैफलीत माझ्या ही गझल गायल्यानंतर चित्रपट निर्माते संजय भन्साळी यांनी मला फोन करुन बोलवून घेतले. तिथे त्यांनी ती गजल पुन्हा ऐकली आणि त्यानंतर मला पिंगाची संधी मिळाली.