शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हिरालाल जाधवांच्या अडचणीत वाढ

By admin | Updated: December 31, 2016 03:50 IST

ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधिक्षक हिरालाल जाधव यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या कारागृहातील

ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधिक्षक हिरालाल जाधव यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या कारागृहातील त्या महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्तस्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जाधव यांच्या विरोधात विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणि अ‍ॅट्रॉसिटी असे एकाच पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आधीच्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समिती नेमली आहे.पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जाधव यांनी स्वत: तसेच विविध हस्तंकामार्फत विविध प्रकारे त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सुरू केले आहेत. याबाबत आपण वेळोवेळी पोलीस, न्यायालय आणि कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे म्हटले आहे. तसेच याचदरम्यान, जाधव हे विविध उच्चपदस्थ सरकारी कार्यालयामध्ये अर्ज करुन माझ्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. कारागृह विभागाचे महासंचालक यांना दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याविरुद्ध कार्यवाही होवू नये म्हणून अप्रत्यक्षरित्या कारागृह महासंचालक मदत करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मी अनुसुचित जातीची असूनही कट रचून त्यामध्ये मिश्रा यास सामील करुन खोटी कागदपत्रे तयार करून काही वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध करुन बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)गुन्हा दाखल झाल्याबाबत दुजोरा देऊन अद्यापही कोणालाही अटक केलेली नाही. तसेच याप्रकरणी पोलीस सहाय्यक आयुक्त स्तरावर चौकशी सुरू आहे.- एम.व्ही.धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर पोलीस स्टेशन मी स्वत: मागासवर्गीय आहे, त्यामुळे माझ्याविरोधात अ‍ॅस्टॉसिटीन्वये कसा काय गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच अमित मिश्रा याच्याशी माझा काहीही संबंध नाही. - हिरालाल जाधव,निलंबित अधिक्षक