शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका होणार हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:48 IST

ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका आता हायटेक झाल्या आहेत. त्यांच्यासह मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या हाती स्मार्ट फोन आले आहेत.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका आता हायटेक झाल्या आहेत. त्यांच्यासह मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या हाती स्मार्ट फोन आले आहेत. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तीन हजार ६९५ सेविका आणि १३७ पर्यवेक्षिकांना सीमकार्डसह स्मार्ट फोनचे वाटप झाले आहे. या स्मार्ट फोनमध्ये देण्यात आलेले अ‍ॅप कसे हाताळावे, यासाठी १८० मस्टर ट्रेनरकडून सेविकांना प्रशिक्षण दिल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली. यामुळे अंगणवाडीत कामांचे नोंदणी रजिस्टर कायमचे हद्दपार होणार आहे.पोषण अभियानांतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्र माची अंमलबजावणी करण्यात येत असून, सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका यांना स्मार्ट फ ोन दिले जात आहेत. केंद्र शासनाकडून अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.>११ प्रकारची रजिस्टर हद्दपारबालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासनाने अंगणवाड्या सुरू केलेल्या आहेत. या अंगणवाडी केेंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच त्यांचे वजन, उंची, त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना ११ प्रकारच्या विविध रजिस्टरमध्ये लिहून ठेवावा लागत होता. मात्र, आता सेविकांना देण्यात येत असलेल्या स्मार्ट फोनमध्ये कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफटवेअर (कॅश) हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे सर्व नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील रजिस्टर संपुष्टात येऊन अंगणवाडीतार्इंचा कामाचा ताणही कमी होणार आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), मुख्य सेविका, कुशल अंगणवाडीसेविका यांना अंबरनाथ येथे २७ ते २९ मे दरम्यान स्मार्ट फोनमधील कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफटवेअर (कॅश) हे नवीन अ‍ॅप कसे हाताळावे, त्यात माहिती कशा प्रकारे भरण्यात यावी, यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती भोसले यांनी दिली.>अंगणवाडी केंद्र होणार डिजिटलजिल्ह्यातील सर्वच अंगणवाडीसेविकांना आता स्मार्ट फोन दिला जाणार आहे. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांची माहिती अ‍ॅपद्वारे आॅनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांचीही आता डिजिटलकडे वाटचाल सुरू झालेली आहे. मोबाइलमधील अ‍ॅपमध्ये बालकांच्या वैयक्तिक माहितीसोबतच त्याचे लसीकरण कधी झाले, आगामी लसीकरण कधी आहे, याबाबत त्यांच्या पालकांना मेसेज पाठवण्यासाठी बालकांच्या पालकांचेही मोबाइल नंबर घेण्यात येणार आहेत.