शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

फेरीवाले आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये हमरीतुमरी, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:49 PM

Nalasopara : वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी सकाळी नालासोपारा पूर्वेकडील परिसरात ९० टक्के दुकाने उघडण्यात आली होती.

नालासोपारा : पूर्वेकडील ओव्हर ब्रिजच्या खाली आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना उठवण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. तुळींज पोलिसांनी हस्तक्षेप करून अनधिकृत फेरीवाल्यांना उठवून लावले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाव्यतिरिक्त उघडी असणारी दुसरी दुकाने मनपा कर्मचारी आणि पोलिसांनी बंद केली. वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी सकाळी नालासोपारा पूर्वेकडील परिसरात ९० टक्के दुकाने उघडण्यात आली होती. तर अनधिकृत फेरीवाले ओव्हर ब्रिजच्या खाली व रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृतपणे बसून व्यवसाय करत होते. या रस्त्याने चालता येत नसल्याने अनेकांनी वसई-विरार महापालिका आणि पोलीस प्रशासनाला संपर्क साधला. यानंतर कारवाईसाठी आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांसोबत या फेरीवाल्यांनी हुज्जत घातली. तुळींज पोलिसांनी तातडीने मनपा कर्मचाऱ्यांसोबत जाऊन कारवाई केली व रस्ता नागरिकांना चालण्यासाठी मोकळा केला. तसेच कपडे, भांडी, मोबाइल दुकाने व इतर अतिआवश्यक सेवेत समाविष्ट नसणारी उघडी दुकाने विनंती करून बंद करण्यास सांगितले. यानंतर दुकाने उघडी दिसली तर गुन्हे दाखल करून कारवाईचा इशाराही दुकानदारांना देण्यात आला आहे. फेरीवाले पुन्हा बसू नयेत म्हणून पोलीस कर्मचारी आणि आरसीपीचे प्लाटून बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहे. 

फेरीवाल्यांसाठी मनपातर्फे ओस्तवाल नगरी, सेंट्रल पार्क मैदान आणि मोरेगाव तलावाच्या मागे जागा देण्यात आली आहे. परंतु हे फेरीवाले तिथे न जाता स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात अनधिकृतपणे रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. - विजय पाटील, अधिकारी, ब प्रभाग, महानगरपालिका

अतिआवश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने उघडी होती, त्यांना विनंती करून दुकाने बंद करण्यास सांगितले आहे. पुन्हा दुकाने उघडली तर गुन्हा दाखल करून कारवाई करणार. - राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे