“दुसऱ्या मुलीशी संबंध होते, शिजान खानने केला तुनीषा शर्माचा विश्वासघात”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:02 AM2022-12-30T06:02:44+5:302022-12-30T06:04:10+5:30

केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी तुनीषाच्या घरी येऊन तिच्या आईची भेट घेतली.

had an affair with another girl sheezan khan betrayed tunisha sharma | “दुसऱ्या मुलीशी संबंध होते, शिजान खानने केला तुनीषा शर्माचा विश्वासघात”

“दुसऱ्या मुलीशी संबंध होते, शिजान खानने केला तुनीषा शर्माचा विश्वासघात”

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड : शिजान खान याचे दुसऱ्या मुलीशी संबंध होते, त्याने तुनीषा शर्माचा विश्वासघात केल्याने तिने आत्महत्या केली, अशी माहिती केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांना अभिनेत्री तुनीषाची आई वनिता यांनी दिली. 

आठवले यांनी गुरुवारी तुनीषाच्या घरी येऊन तिच्या आईची भेट घेतली. आठवलेंशी बोलताना वनिता यांनी आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. शिजान घरी येत-जात होता. माझेसुद्धा त्याच्याशी बोलणे होत होते. 

शिजानला फाशी झाली पाहिजे, असे सांगत या खटल्यासाठी आपण ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बोललो आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निकम यांना नियुक्त करण्याबाबत बोलू, असे आठवले यांनी वनिता यांना सांगितले. आरपीआयच्या वतीने तीन लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: had an affair with another girl sheezan khan betrayed tunisha sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.