शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

‘अनुभवाला कवितेचे अस्तर असलेले लेखन ग्रेटच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 01:01 IST

कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते.

ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल, तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल, असे मत ज्येष्ठ कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या ‘मौनाची स्पंदने’ या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी तिच्याच राहत्या घरी पार पडला. यावेळी आपले मनोगत मांडताना म्हात्रे म्हणाले की, कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा विचार करणे, स्वत:मधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे, ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत.

कवितालेखन करताना स्वत:ला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट. मात्र, ही किमया मानसीला उत्तम साधली आहे, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी त्यांनी या संग्रहातील ‘परतीच्या वाटेवर अजूनही’ ही कविता वाचून दाखवली. मानसी मनोगतात म्हणाली की, या संग्रहनिर्मितीचे सारे श्रेय माझ्या आईला देते. माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार आहे. व्यास क्रि एशन्सचे संचालक निलेश गायकवाड प्रास्ताविकेत म्हणाले, मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे.

तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे. यावेळी व्यास क्रि एशन्सचे मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी, बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी केले. या कार्यक्रमाला लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, रामदास खरे, मेधा सोमण, निवेदिका साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजुषा पाटील, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर व इतर उपस्थित होते. मानसीच्या ‘आकाश कवेत घेताना’ या आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत, असे गायकवाड यांनी शेवटी जाहीर केले. महापौर नरेश म्हस्के यांनी शेवटी मानसीला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले, तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे