भिवंडी रोड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 00:21 IST2025-05-14T00:14:11+5:302025-05-14T00:21:00+5:30
दिवा वसई या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

भिवंडी रोड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: वसई दिवा रेल्वे मार्गावरील भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते खारबाव रेल्वे स्थानक दरम्यान कालवार या ठिकाणी रोहा येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या मालगाडीचे एक चाक रुळावरून घसरले.ज्यामुळे दिवा वसई या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
या दुर्घटने नंतर दिवा वरून वसईच्या दिशेने जाणारी पसेंजर रेल्वे भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबवून पुन्हा माघारी दिवा कडे रवाना करण्यात आल्या होत्या.
या दुर्घटनेमुळे वसई वरून दिवा कडे जाणारी पसेंजर व पनवेल डहाणू ही पसेंजर गाडी रद्द करण्यात आली.घटनास्थळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून युद्ध पातळीवरून रेल्वे रुळावर उचलून घेण्यासाठी यंत्रसामुग्री घेऊन काम सुरू केले आहे.वसई दिवा मार्गिका सुरळीत सुरू असून या मार्गा वरील एक्सप्रेस व मालगाड्या धिम्यागतीने सुरू राहणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.