सोनसाखळी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST2021-06-11T04:27:21+5:302021-06-11T04:27:21+5:30

------------------ दुचाकी चोरीला कल्याण : विकी लबाना याने त्याची दुचाकी २४ मे रोजी पश्चिमेतील भारत पेट्रोलपंप जवळील लॉलीपॉप ...

Gold chain lampas | सोनसाखळी लंपास

सोनसाखळी लंपास

------------------

दुचाकी चोरीला

कल्याण : विकी लबाना याने त्याची दुचाकी २४ मे रोजी पश्चिमेतील भारत पेट्रोलपंप जवळील लॉलीपॉप शोरूमजवळ पार्क केली होती. तेथून मध्यरात्रीच्या सुमारास ती गाडी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी लबाना यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

----------------------------------------

मारहाणप्रकरणी गुन्हा

डोंबिवली : कार काढण्यास सांगताना शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या सुरेश भुवड यांना अन्वर शेख, समीर शेख, हर्षद शेख आणि आवेश पटेल यांनी फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता मानपाडा रोडवरील मोतीनगर, श्री पार्क अपार्टमेंट येथे घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------------

वाहनचोरीचे सत्र सुरूच

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. बिपिन मारू यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या पश्चिमेतील पुंडलिक व्हिला, शिंदे बिल्डिंगजवळ ४ जूनला पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्री चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारू यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------------

Web Title: Gold chain lampas