मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी 

By धीरज परब | Published: May 21, 2024 09:29 PM2024-05-21T21:29:24+5:302024-05-21T21:29:45+5:30

HSC Exam Result: १२ वी परिक्षेच्या मंगळवारी जारी झालेल्या निकालात मीरा भाईंदर मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे .  ९३.४९ टक्के इतका शहराचा निकाल लागला आहे . 

Girls' 12th round in Meera Bhayander | मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी 

मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी 

 मीरारोड - १२ वी परिक्षेच्या मंगळवारी जारी झालेल्या निकालात मीरा भाईंदर मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे .  ९३.४९ टक्के इतका शहराचा निकाल लागला आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ विच्या परीक्षेसाठी मीरा भाईंदर मधून  एकूण ७ हजार ९९४  विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते . त्यात ४ हजार १९३ मुले व ३ हजार ८०१ मुली परीक्षार्थी होत्या. प्रत्यक्षात १२ विच्या परिक्षेत ४ हजार १७८ मुल व ३ हजार ७८७ मुली अश्या एकूण ७ हजार ९६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मंगळवारी परीक्षेचा निकाल लागला असता त्यात ७ हजार ४४७ मधील विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून निकालाची एकूण टक्केवारी ९३.४९ टक्के इतकी आहे .  त्यातील उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.९८ टक्के तर उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९५.१६ टक्के इतकी आहे . ३ हजार ८४३ मुलं तर ३ हजार ६०८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत . 

Web Title: Girls' 12th round in Meera Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.