शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर किल्ल्यासाठी होतोय विलंब!

By admin | Updated: January 12, 2016 02:22 IST

ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किल्ल्याच्या सभोतालचा परिसर ठाणे महापालिकेकडे (टीएमसी) हस्तांतर होणे गरजेचे आहे. परंतु, सुमारे एक

- सुरेश लोखंडे,  ठाणे ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किल्ल्याच्या सभोतालचा परिसर ठाणे महापालिकेकडे (टीएमसी) हस्तांतर होणे गरजेचे आहे. परंतु, सुमारे एक वर्षापासून हा विषय फाईलमध्येच अडकल्यामुळे हस्तांतरणास विलंब झाल्याचा सूर जिल्हा नियोजन समितीत ऐकायला मिळाला. घोडबंदर किल्ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असून, पुरातत्त्व खात्याच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे तेथे सोयीसुविधा देण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यास लागून असलेल्या महामार्गासदेखील घोडबंदर रोड म्हणून संबोधले जात आहे. ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्राजवळील हा घोडबंदर किल्ला ठाणे, मुंबई परिसरासह राज्यातील गडकिल्ले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐतिहासिक असलेला हा किल्ला ठाणे शहराचे भूषण आहे. परंतु, डागडुजीअभावी त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याशिवाय, आजूबाजूच्या परिसरात गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे.एका बाजूला डोंगरदऱ्या तर दुसऱ्या बाजूला खाली नागलाबंदर, घोडबंदर खाडी या निसर्गाच्या सान्निध्यातील या किल्ल्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. याशिवाय, खाली असलेल्या उच्चभ्रू लोकांच्या गगनचुंबी इमारती त्याची शोभा वाढवत आहेत. निसर्गाचे योगदान लाभलेल्या या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक त्या सोयीसुविधा देणे क्रमप्राप्त आहे. पण, त्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाकडून विरोध होत असल्याचे उघड झाले आहे. किल्ल्याचा परिसर महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा ठराव मागील दीड वर्षापूर्वीच झाला असून, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नुकत्याच झालेल्या डीपीसी बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. परंतु, वन विभागाने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.