शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गौरींचे आगमन थाटात

By admin | Updated: September 20, 2015 00:04 IST

शनिवारी सर्वत्र गौरी आणि महालक्ष्मींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. या दोघीही माहेरवाशीण म्हणून त्यांचा बंधू असलेल्या गणरायाकडे येतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

ठाणे : शनिवारी सर्वत्र गौरी आणि महालक्ष्मींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. या दोघीही माहेरवाशीण म्हणून त्यांचा बंधू असलेल्या गणरायाकडे येतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामीण भागात हिरवी गौर किंवा वृक्ष गौर, निसर्ग गौर या रुपात गौरींचे आगमन झाले. ज्यांच्याकडे मूर्तीच्या स्वरुपात गौर बसते त्यांच्याकडे तिचे मिरवणुकीने वाजतगाजत आगमन झाले. तर ज्यांच्याकडे महालक्ष्मींची स्थापना होते. त्यांच्याकडे पारंपारिक साठे सजवून त्यावर पारंपारिक पितळी अथवा शाडू किंवा प्लास्टर आॅफ पॅरिसचे मुखवटे ठेवून त्यांची स्थापना झाली.ज्यांच्याकडे महालक्ष्मीच्या स्वरुपात स्थापना झाली. त्यांनी तिचे मुखवटे दारातून घरात आणून लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने, लक्ष्मी आली रुप्याच्या पावलाने, लक्ष्मी आली मोत्याच्या पावलाने असा गजर करीत त्यांची स्थापना केली. ज्यांच्याकडे दरवर्षी विसर्जित करावयाच्या मूर्तीच्या रुपात गौरीची स्थापना होते. त्यांनी सकाळपासूनच ही मूर्ती घरी नेण्यासाठी चित्रशाळा किंवा विक्रेत्यांच्या दुकानासमोर गर्दी केली होती. चारचाकी हातगाडी किंवा वाहन सजवून त्यातून गौर नेतांना बॅन्जो, ढोल पथक, ताशे यांचा गजर करीत समोर महिला नृत्य करीत होत्या.आज गौरींच्या आगमनाचा दिवस असून उद्या त्यांचा महानैवेद्य होईल. तर सोमवारी त्यांचे विसर्जन होईल. गौरींच्या आगमनामुळे हार, फुले, वेण्या, गजरे, गुलाबाची फुले, सोनचाफ्याची फुले, शेवंती, मोगरा याचे भाव आज चांगलेच कडाडले होते. उद्या सर्वपूजा साहित्याचे आणि फुलांचे भाव आणखीनच वधारलेले असतील. अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. तर त्यांच्यासमोर ठेवल्या जाणाऱ्या पाच फराळांच्या ताटांमुळे चकली, शेव, अनारसा, करंजी, साठोरी, लाडू या घरगुती फराळांच्या वस्तूंचे भावही चांगलेच वधारले होते. अनेक ठिकाणी या दुकानांसमोर रांगाही लागल्या होत्या. आगरी व कोळी समाजात गौरी स्थापनेचा जल्लोष आगळा-वेगळाच असतो. ती आणत असतांना तिच्यापुढे त्यांच्याकडून होणारे नृत्य बघणे हा देखील वेगळाच आनंद असतो. (प्रतिनिधी)