शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

खेळाचं मातीशी नातं तुटत चाललंय !

By admin | Updated: December 28, 2015 02:02 IST

इंटरनेटच्या जमान्यात आता खेळाचं मातीशी नातं तुटतं चाललंय. कबड्डी आणि खो-खो सुद्धा मातीत खेळलं जात नाही. बुट आले आणि माती गेली

वसई : इंटरनेटच्या जमान्यात आता खेळाचं मातीशी नातं तुटतं चाललंय. कबड्डी आणि खो-खो सुद्धा मातीत खेळलं जात नाही. बुट आले आणि माती गेली. मातीचा स्पर्शसुद्धा होऊ दिला जात नाही. कारण मॅट सारख्या बाबींचा वापर होतो. , अशी खंत सिने दिग्दर्शक-कलावंत मकरंद देशपांडे यांनी वसईत २६ व्या कला-क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली.५० हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेल्या २६ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे काल वसईच्या चिमाजी आप्पा मैदानावर शानदार उद्घाटन झाले. क्रिकेटपटू धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून तर अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे आणि अमोल गुप्ते यांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले. अभिनेता आयुुष टंडन, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस, आयुक्त सतीश लोखंडे, महोत्सव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ आणि कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे यावेळी उपस्थित होते.मुंबईत आता क्रीडांगणे नावापुरतीच उरली आहेत. क्रीडेचा मातीशी संपर्क तुटला असून आता माती नसलेल्या मैदानात बुट घालून खेळ खेळले जातात, अशी खंत व्यत करताना देशपांडे यांनी कलेत चुकलं तर चालतं. पण क्रीडेत चुकीला माफी नसते. याठिकाणी कला-क्रीडेचा सुंदर समन्वय साधला गेला आहे,असे गौरवोद्गार काढले. महोत्सव एक सुंदर इव्हेंट असून त्यातून कला-क्रीडा जोपासण्याचे काम केले जात आहे. इथून प्रत्येक जण काही ना काही शिकून जातो, असे गौरवोद्गार अमोल गुप्ते यांनी काढले. धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, आयुष टंडन यांनी आपल्या छोटेखानी भाषणात महोत्सवाचे कौतुक केले.पाहुण्यांच्या हस्ते वसईत तालुक्याातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजय चौधरी, अमन चौधरी. तेरेजा डिसोझा, हार्दीक पाटील शुभम वनमाळी, हर्षद म्हात्रे, रवींद्र माने, मुग्धा लेले, प्रा. माणिक दोतोंडे, रमाकांत वाघचौडे आदींचा गौरव करण्यात आला. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात पाक कला, बॉक्सिंग, पुष्परचना, वेशभूषा, सॅलेड डेकोरेशन, शरीरसौष्ठव, प्रश्न मंजूषा, मेंदी, भजन, मूकाभिनय, पारंपारिक वेशभूषा, वादविवाद यांच्यासह ३४ काल आणि ३४ क्रीडा मिळून एकूण ६८ प्रकारात स्पर्धा होणार आहेत. (प्रतिनिधी)