परिवहन सदस्यांच्या स्टिंग आॅपरेशनमुळे चौघे निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:56 AM2020-09-01T02:56:55+5:302020-09-01T02:57:11+5:30

खान यांनी ज्या बसमधून प्रवास केला त्या बसमधील प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही. त्याबरोबर बस मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरून नेण्याऐवजी उड्डाणपुलावरून नेल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

Four suspended due to sting operation of transport members | परिवहन सदस्यांच्या स्टिंग आॅपरेशनमुळे चौघे निलंबित

परिवहन सदस्यांच्या स्टिंग आॅपरेशनमुळे चौघे निलंबित

Next

मुंब्रा : ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांसह सोमवारी सकाळी मुंब्रा येथील परिवहनच्या बसमध्ये प्रवासी बनून केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये प्रवाशांच्या विनंतीनंतरही बस न थांबवणे, मुंब्रा रेल्वेस्थानकापाशी बसचा थांबा असतानाही ती उड्डाणपुलावरून नेणे, प्रवाशांनी बिनधास्त विनातिकीट प्रवास करणे अशा त्रुटी आढळल्याने बसचे चालक दिगंबर राणे, हनुमान साठे तसेच वाहक सुनील बिºहाडे आणि दिलीप भोळे यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश परिवहनच्या व्यवस्थापकांनी दिले.
खान यांनी ज्या बसमधून प्रवास केला त्या बसमधील प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही. त्याबरोबर बस मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरून नेण्याऐवजी उड्डाणपुलावरून नेल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.
त्याचबरोबर एका थांब्यावर चढलेला प्रवासी दुसºया थांब्यावर तिकीट न घेता उतरल्याचे सदस्यांना आढळून आले. या अनियमितता ज्या बसमध्ये घडल्या, त्या बसचा चालक, वाहन यांना निलंबित करावे, अशी मागणी खान यांनी केली. त्यामुळे परिवहन व्यवस्थापकांनी ती मान्य केली. परिवहन सेवा सुधारण्याकरिता यापुढेही स्टिंग आॅपरेशन करू, असे खान यांनी सांगितले.

Web Title: Four suspended due to sting operation of transport members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.