शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

माजी रणजीपटू चांदोरकर यांनी पूर्ण केले वयाचे नाबाद शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:06 IST

वृद्धाश्रमामध्ये वाढदिवस साजरा : एमसीएकडून मानाची टोपी प्रदान

अंबरनाथ : महाराष्ट्र तसेच मुंबई संघाकडून रणजी क्रिकेट खेळलेले ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू रघुनाथ चांदोरकर यांनी शनिवारी वयाचे शतक पूर्ण केले. यानिमित्त चांदोरकर यांच्या शंभराव्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन येथील कमलधाम वृद्धाश्रमात केक कापून कुटुंबीयांसमवेत दणक्यात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मानाची टोपी आणि सन्मानपत्र देऊन चांदोरकर यांचा यथोचित सन्मान केला.चांदोरकर यांचे पणतू पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर सहकुटुंब उपस्थित होते. वृद्धाश्रमाच्या संचालिका आणि अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे आदींनी उत्साही वातावरणात चांदोरकर यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचे अभीष्टचिंतन केले.

मधल्या फळीतील फलंदाज आणि लेगस्पिनर अशी अष्टपैलू खेळाडू ओळख असलेले चांदोरकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. १९४६ ते ४७ या कालावधीत पाच रणजी सामन्यांंत त्यांनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते. यानंतर ते १९५०-५१ च्या मोसमात मुंबई संघाकडून दोन रणजी सामने खेळले होते. मुंबईत पुरुषोत्तम शिल्ड आणि कांगा लीग क्रिकेट स्पर्धेतही त्यांनी शानदार खेळी केली होती. क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल आणि हॉकी खेळामध्येही त्यांना आवड होती. असे असले तरी त्यांनी क्रिकेटला प्राधान्य दिले.  चांदोरकर गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची वद्धाश्रमात सेवा केली जात आहे.

आजारी असतानाही शुभेच्छा देणाऱ्यांचे हसतमुखाने केले स्वागत सध्या डोंबिवलीत असणारे चांदोरकर आजारी असल्याने त्यांच्यासाठी केअर टेकरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, कोरोना कालावधीत केअर टेकर घरी येत नसल्याच्या कारणावरून त्यांची सोय सध्या अंबरनाथ येथील कमलधाम वृद्धाश्रमात करण्यात आली आहे. चांदोरकर यांचा शनिवारी वाढदिवस म्हणून ते राहत असलेली त्यांची खोली सजवण्यात आली होती. वाढत्या वयोमानानुसार त्यांची स्मृती धूसर झाली असली, तरी आजही या वयात त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे हसतमुखाने स्वागत केले.

टॅग्स :thaneठाणेRanji Trophyरणजी करंडक