शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यात पाच सक्षम रस्त्यांचे जाळे

By admin | Updated: September 8, 2016 02:25 IST

मुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा

मुरलीधर भवार, कल्याणमुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाणार आहे. रस्ते विकास व सुनियोजित शहर विकास प्रकल्पामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात टिटवाळा, गोवेली, खडवली ही ठिकाणे विकासाचे केंद्रविंदू ठरणार आहेत. कल्याण-मुरबाड रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी जवळपास ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाची निविदा भूसंपादनाच्या प्रक्रियेनंतर काढली जाणार आहे. कल्याण ते टोकावडेपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्यात असलेल्या नदीवरील पुलांचेही चौपदीकरण करून ते नव्याने विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे कल्याण-माळशेज मार्गावरील कोंडी दूर होईल. हा रस्ता टोल फ्री असेल. एमएमआरडीएतर्फे शिरसाट फाटा ते उरण रस्ता दुपदरी केला जाणार आहे. हा रस्ता खडवली, गोविली, बदलापूरमार्गे उरणला जोडला जाईल. या रस्त्यावरील भातसा नदीवर खडवली येथील पूल, काळू नदीवरील टिटवाळा येथील पूल आणि उल्हास नदीवरील आपटी येथील पूलही रुंद केले जातील. वडदोरा ते उरणदरम्यान जवळपास ७०० कोटी खर्चून नव्याने सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा रस्ता मानिवली, गोवेली, रायते, आणे, भिसोळ, घोटसई या मार्गे उरणला जोडला जाईल. परंतु, वांगणीनजीक सह्याद्रीच्या फूटहिल्स असलेल्या डोंगराला बोगदा पाडून हा रस्ता उरणकडे मार्गस्त होईल. या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येईल. मुंबई-नागपूरदरम्यान नवीन सहा पदरी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. सरकारचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. चिंचवली येथे या रस्त्याचे आउटलेट आहे. याच रस्त्यावर एक हजार एकर जमीन संपादित करून तेथे नवी औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यास सुनियोजित शहराचा दर्जा दिला जाणार आहे. हा विकास सिडकोच्या धर्तीवर केला जाईल. त्यामुळे फळेगाव उतणे, नडगाव, दानगाव, चिंचवली, राया, उशीद या गावांचा परिसराचा कायापालट होणार आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाईल.शहापूर ते कर्जत चौपदरी रस्त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. हा रस्ता टोलफ्री असेल. या रस्त्यामुळे नाशिक मार्गावरील वाहतूक पुणेमार्गे वळवली जाईल. शहापूर व मुरबाडमधील प्रवासी व मालवाहतूकदारांना कल्याणला वळसा घालावा लागणार नाही.