महिलांना ठकवणाऱ्या पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:06+5:302021-03-04T05:17:06+5:30

मीरा रोड : महिलांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या पाच आरोपींना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. २५ ...

Five arrested for cheating on women | महिलांना ठकवणाऱ्या पाच जणांना अटक

महिलांना ठकवणाऱ्या पाच जणांना अटक

मीरा रोड : महिलांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या पाच आरोपींना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे.

२५ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मीरा रोडच्या गौरव व्हॅली कॉम्प्लेक्स येथे राहणारी महिला हटकेश चौक भागातून जात असताना अनोळखी व्यक्तींनी बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केल्याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भांबरे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला.

पथकाने तपास करून अहमदाबाद येथे राहणाऱ्या पाच आरोपींना गुजरातमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत अटक केली. या आरोपींनी काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी दोन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून आतापर्यंत ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त केली आहे.

Web Title: Five arrested for cheating on women