Fire at waste from Umberde project | उंबर्डे प्रकल्पातील कचऱ्याला आग

उंबर्डे प्रकल्पातील कचऱ्याला आग

------------------------------------------------------

पाचजणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत रविवारी कोरोनाचे एक हजार ४७५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, पाचजणांचा मृत्यू झाला आहे, तर एक हजार २१९ रुग्णांना उपचाराअंती बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या १६ हजार ३१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख सहा हजार ३३ पर्यंत पोहोचला आहे. यातील ८८ हजार ४०१ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक हजार ३२२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गुरुवारी कल्याण पूर्वेत २८४, डोंबिवली पूर्वेत ४२३, कल्याण पश्चिमेत ४२९, डोंबिवली पश्चिमेला २३०, मांडा-टिटवाळा ८६, मोहना येथे २३ नवे रुग्ण आढळले आहेत.

------------------------------------------------------

जंतुनाशक फवारणी

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता रविवारी शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेच्या माध्यमातून प्रभागामधील भोईरवाडी ते आरटीओ रोड येथील सोसायटींमध्ये जंतुनाशक फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

------------------------------------------------------

Web Title: Fire at waste from Umberde project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.