शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 10:00 IST

सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली.

ठळक मुद्देसिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली

ठाणे : येथील वसंत विहार येथे सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात उभ्या केलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत सहा वाहनांनी पेट घेतल्याची घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तीन वाहने जळून खाक झाली असून यामध्ये एक चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचा समावेश आहे.

सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली. यामध्ये इतर पाच वाहनांनीही पेट घेतला. वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवत असताना, तीन वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून अन्य तीन गाड्यांचेही या आगीत नुकसान झाले आहे.  दरम्यान, ही आग दोन चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांना लागली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. तसेच या घटनेत कोणीतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 

टॅग्स :fireआगthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी