ठाण्यात महावितरणच्या ट्रान्सफार्मर केबलला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 13:02 IST2022-03-01T13:00:21+5:302022-03-01T13:02:38+5:30
Fire in Thane : ही आग किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

ठाण्यात महावितरणच्या ट्रान्सफार्मर केबलला आग
ठाणे: महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या केबलसह जवळच असलेल्या लाकडाच्या फळीला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चराई नाका, अल्मेडा सिग्नल, न्यू-कादंबरी सोसायटी समोर घडली.
ही आग किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच,महावितरण, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविले.