शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरण!

By admin | Updated: January 24, 2017 05:45 IST

वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा अभिनव उपक्रम ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी

ठाणे : वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा अभिनव उपक्रम ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सुरू केला आहे. ‘आरटीओ’च्या अखत्यारितील अत्याधिक महत्त्वाचे हे काम पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.व्यावसायिक वापरासाठी नवीन वाहन विकत घेताना दोन वर्षे मुदतीचे योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर, मात्र ही वाहने रस्त्यावर धावण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत अथवा नाही, याबाबतचे प्रमाणपत्र दरवर्षी ‘आरटीओ’कडून घेणे बंधनकारक असते. वाहनांची ही योग्यता तपासण्याची प्रक्रिया तंत्रशुद्ध पद्धतीने व्हावी, यासाठी न्यायव्यवस्था आग्रही आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य नसलेली वाहने रस्त्यावर धावतात आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. अपघातांचे वाढते प्रमाण विचारात घेता वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निर्दोष पद्धतीने व्हावी, यासाठी परिवहन विभागाने ठोस पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वाहनांची योग्यता तपासण्यासाठी ‘आरटीओ’च्या सर्व कार्यालयांकडे किमान २५० मीटर लांबीची स्वत:ची जागा असावी, या मुद्यावरही न्यायालय आग्रही असून ही व्यवस्था करण्याबाबत न्यायालयाने परिवहन विभागास बजावलेही आहे. स्वमालकीच्या जागेचा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सुरू आहे. सद्य:स्थितीत वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचे काम ठाण्यातील कशेळी आणि कोलशेत भागात केले जाते. स्वमालकीच्या जागेचा प्रश्न सुटेपर्यंत, वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा निर्णय ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार, गत दोन दिवसांपासून चित्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कॅमेरामनची व्यवस्थाही कार्यालयाने केली आहे. अशा प्रकारचे चित्रीकरण करण्याची व्यवस्था पुणे, लातूर आणि औरंगाबादसारख्या ‘आरटीओ’च्या राज्यातील मोजक्या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. या कार्यालयांकडे वाहनांची योग्यता चाचणी घेण्यासाठी स्वमालकीची जागा आहे. ठाणे कार्यालयात मात्र स्वमालकीची जागा नसतानाही हा उपक्रम सुरू आहे. या निर्णयामुळे हे महत्त्वाचे काम पारदर्शक पद्धतीने पार पडण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)