ठाण्यातील 'त्या' नादुरुस्त लिफ्टप्रकरणी गुन्हा दाखल करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 21:31 IST
Jitendra Awhad :याप्रकरणी हलगर्जी केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ट्वीटद्वारे केली आहे.
ठाण्यातील 'त्या' नादुरुस्त लिफ्टप्रकरणी गुन्हा दाखल करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
ठाणे: पोडियमच्या पहिल्या मजल्यावरुन थेट तळमजल्यावर कोसळलेल्या लिफ्टमध्ये अडकलेल्या ४१ वर्षीय अनिल थत्ते हा अन्न पदार्थांचे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याची शनिवारी रात्री ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटका केली होती. याप्रकरणी हलगर्जी केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ट्वीटद्वारे केली आहे.
ठाण्यातील मानपाडा येथील निळकंठ वुडस्मधील ओलिविया ए या तळ अधिक ३१ मजली इमारतीच्या लिफ्टला ३० जुलै २०२२ रोजी रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ही लिफ्ट पोडियम एक या मजल्यावरुन दूसऱ्या मजल्यावर जात असताना अचानक तळमजल्यावर येऊन कोसळली. या दरम्यान या लिफ्टमध्ये अन्न पदार्थांचे वितरण करणाऱ्या खासगी कंपनीचा कर्मचारी अनिल थत्ते हा दुसºया मजल्यावर डिलीव्हरी देण्यासाठी जात असतांना अडकला. ही माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदतकार्य राबवून त्या लिफ्टमधून थत्ते याची सुटका केली. मात्र, योग्य देखभालीअभावी हा अपघात झाला असून संबंधित विकासकाने याबाबत रहिवाशांची भेट घेऊन विचारपूसही केली नाही. याबद्दलही आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.