शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी इटलीहून भारतात परतल्याने वडिलांनी मानले सरकारचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 02:28 IST

सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या.

ठाणे : जगभरात उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे इटलीहून भारतात येणे माझ्या मुलीसाठी कठीण दिसत होते. परंतु, भारत सरकारने माझ्या मुलीला भारतात परतण्यासाठी जी मदत केली, त्याबद्दल मी ऋणी राहील. ती भारतात सुखरूप आली, हे पाहून माझ्या जीवात जीव आला. सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या.पाचपाखाडी येथे राहणारी संजना कदम ही इटली येथे ४ फेब्रुवारी २०२० ला उच्च शिक्षणासाठी गेली. तेथे गेल्यानंतर तिचे २० फेब्रुवारी रोजी महाविद्यालय सुरू होणार होते. इटलीची राजधानी मिलान येथे ती वास्तव्यास होती. जिथे भाडेतत्त्वावर रूम घेतली, त्यांनीही चार महिन्यांचा करारनामादेखील केला. परंतु, कोरोनाचे संकट यायला सुरुवात झाल्यावर दर सात दिवसांनी सांगायचे की, महाविद्यालय काही दिवसांनी सुरू होईल. यादरम्यान महाविद्यालयाने आॅनलाइन अभ्यास सुरू केला. १० मार्च रोजी तेथील सुपर मार्केटही बंद करण्यात आले. संजनाकडे १५ दिवसांचा अन्नसाठा होता. तिने आपले वडील सुजय कदम यांना ही परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तिला तातडीने भारतात निघून येण्यास सांगितले. परंतु, प्रवास करायचा असेल तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असे प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर माहिती देण्यात आली होती. त्यावेळी वडील कदम यांनी भारतीय दूतावासाला पत्र लिहिले व त्यात सांगितले की, ‘माझी मुलगी इटलीमध्ये अडकली असून तिला प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करा,’ आणि संजनाची माहितीही देण्यात आली. १२ मार्च रोजी कदम यांनी त्यांना ई-मेल केला होता. त्यावेळी भारतीय दूतावासाने मिलान दूतावासाशी संपर्क केला आणि मिलान दूतावासाने १३ मार्च रोजी संध्याकाळी संजनाला संपर्क करून दुसऱ्या दिवशी भारतात जाण्यासाठी विमान तयार आहे, असे सांगितले. १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता ती विमानात बसून १५ मार्च रोजी भारतात परतली.विमानातही तिच्यासह इतर प्रवाशांचीही विशेष काळजी घेण्यात आली. नवी दिल्लीत आल्यावर तिला आयटीबीपी रुग्णालयात ठेवण्यात आले. तिची तपासणी केली, त्यावेळी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत.पुढील १२ दिवस तिला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. भारतात कोरोनासंदर्भात जितक्या तत्परतेने कार्यवाही केली जाते, तितकी इटलीमध्ये नाही. भारतीय दूतावासाने स्वजबाबदारीवर तिला भारतात आणले, असे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Familyपरिवारthaneठाणे