शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी पुरस्कार परत करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By admin | Updated: March 21, 2017 01:44 IST

एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा

बदलापूर : एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर देण्यावरुन वाद सुरु असताना वांगणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विजेसाठीचा आपला संघर्ष तीव्र केला आहे. योग्य दाबाने, पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतीचे नुकसान होत आहे. हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कृषीदिनी राज्य सरकारकडून मिळालेले सर्व पुरस्कार परत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.अंबरनाथ तालुक्यातील उल्हासनदी किनारी काराव, इंदगाव येथील शेतकऱ्यांना चार वर्षांपासून अनियमित आणि कमी दाबाने वीजपुरवठा होतो. परिणामी, चार वर्षात त्यांचे किमान चाळीस वीजपंप जळाले आहेत. वीज पुरवठ्यासंदर्भात काराव येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, रमेश देशमुख, दिलीप देशमुख व विलास देशमुख यांनी अनेकदा वीज वितरण विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र तरीही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मार्च २०१३ ला उपअभियंत्यांना त्यांनी पहिले पत्र दिले. त्यानंतर फेबु्रुवारी २०१४ ला कल्याणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. तरीही कारवाई न झाल्याने जुलै २०१४ ला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा उपअभियंत्यांना निवेदन दिले. या नंतर एक अधिकारी तेथे आला. त्याने पाहणी केली. ‘यावर उपाय म्हणजे तुमच्या खर्चाने खांब बसवून घ्या. म्हणजे तुमचा प्रश्न सुटेल,’ असे त्यांना सांगितल्याचे विलास देशमुख म्हणाले. आम्ही शासनाकडे कर्जमाफी मागत नाही की वीज बिलात सूटही मागत नाही. वेळच्या वेळी आम्ही बिले भरत असतो. असे असताना गेल्या चार वर्षांपासून वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करण्याची मागणी लोकशाही मार्गाने करूनही जर आमच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल, तर आम्हालाही आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे दिलीप देशमुख म्हणाले. कृषी विभागाकडून चांगले सहकार्य मिळते. मात्र वीज खात्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. येथील गंजलेले खांब आणि वीजवाहिन्या तातडीने बदलून योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठा करावा. पुरवठा महिन्याभरात सुधारला नाही, तर येत्या कृषीदिनी शासनाचे सर्व पुरस्कार शासनाला परत करू, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)