शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा प्रकार उघड

By admin | Updated: March 23, 2017 01:30 IST

पैशांसाठी पोटच्या मुलीची शरीरविक्रय व्यवसायासाठी विक्री करण्याचा प्रयत्न करणारी आई, मुलीची बहीण व दलाल यांना पोलिसांनी

मीरा रोड : पैशांसाठी पोटच्या मुलीची शरीरविक्रय व्यवसायासाठी विक्री करण्याचा प्रयत्न करणारी आई, मुलीची बहीण व दलाल यांना पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. ट्रान्सफॉर्मिंग लाइव्ह फाउंडेशन या संस्थेचे मनोहर वाघेला यांना प्रवीण पुजारी (३५) या दलालामार्फत चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचा शरीरविक्रयासाठी ९० हजारांचा सौदा ठरत असल्याचे समजले. वाघेला यांनी ही माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अक्षीक्षक डॉ. महेश पाटील यांना दिली. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकटेश आंधळे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहायक निरीक्षक संजय बांगर यांना कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. मीरा रोडच्या जीसीसी क्लबजवळील पूनम अमिषा इमारतीच्या एका सदनिकेत आंधळे व बांगर यांच्यासह आसवले, गोलाईत, चासकर, गावडे, यंबर यांनी धाड टाकून दोन महिलांसह प्रवीण याला अटक केली. तेथे सापडलेल्या १४ वर्षांच्या मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांनी महिलांची चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला. आरोपींमध्ये मुलीची आई, तर तिची मोठी बहीण असल्याचे निष्पन्न झाले. मुलीचे वडील राजस्थानमध्ये शेती करतात. सदनिका त्यांच्या मालकीची आहे. बहीण ही बोरिवलीमधील बारमध्ये काम करत होती. (प्रतिनिधी)